आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १३ वा सामना अनेक कारणांमुळे स्मरणीय ठरला. १३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत झाली. बंगळुरुने या सामन्यावर विजयाची मोहर उमटवली असली तरी राजस्थान रॉयल्सने बंगळुरुला चांगलेच जेरीस आणले. राजस्थानच्या गोलंदाजांनी तर विराट कोहली, फाफ डू प्लेसीसारख्या फलंदाजांनाही चांगलंच रोखून धरलं होतं. युजवेंद्र चहलने विराट कोहलीला धावबाद करत दोन बळी घेतले. त्याच्या याच कामगिरीची सगळीकडे वाहवा होत आहे. युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा त्याच्या या धडाकेबाज खेळावर प्रभावित झालीय. हजारो लोकांच्या उपस्थितीत धनश्रीने आपल्या पतीचं कौतुक केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

राजस्थानने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरु संघ फलंदाजी उतरला होता. बंगळुरुची सुरुवात चांगली झाली. मात्र युजवेंद्र चहलने सलामीवर फाफ डू प्लेसीसला बाद केल्यानंतर बंगळुरुची पडझड सुरु झाली. चहलने डू प्लेसीसला २९ धावांबर बाद केलं. त्यानंतर चहलने विराट कोहलीलाही अवघ्या पाच धावांवर तंबूत पाठवलं.

हेही वाचा >>> Video : विराट कोहली झाला धावबाद, महिला चाहतीला भावना अनावर, स्टेडियममधील व्हिडीओ व्हायरल

बंगळुरु संघाची बाजू भक्कम असताना चहलने विराटला बाद केल्यानंतर सामना राजस्थानकडे वळला. चहलच्या याच कामगिरीचे कौतूक त्याची पत्नी धनश्री वर्मा करत होती. प्रेक्षक गॅलरीत बसलेली धनश्री युजवेंद्रने बळी घेताच आनंदात टाळ्या वाजत होती. धनश्रीचा हा आनंद कॅमेऱ्यात टिपण्यात आलाय. हाच व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

हेही वाचा >>> सामना गमावला तरी बटलरने केली कमाल, आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम रचणारा ठरला पहिलाच खेळाडू

दरम्यान, राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चोख काम केल्यानंतरही बंगळुरुच्या दिनेश कार्तिकने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने एकट्याने मोठे फटके लगावत बंगळुरुला विजयापर्यंत नेलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal wife dhanashree verma celebration went viral in ipl 2022 rr vs rcb match prd