IPLच्या २०१९मध्ये होणाऱ्या हंगामासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळणार आहे. ३१ ऑक्टोबरला याबाबतची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. मात्र आज या वृत्ताला आज अधिकृत दुजोरा मिळाला. त्यामुळे आधी हैदराबाद संघाकडून खेळणारा शिखर धवन आता दिल्ली संघाकडून खेळणार आहे.
शिखर धवनच्या बदल्यात दिल्लाच्या संघाला मोठी किंमत मोजोवी लागली आहे. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात दिल्ली डेअरडेव्हिल्सने अधिकृत ट्विट केले आहे.
Brace yourselves, for he has returned, where it all began!
Welcome Home, Shikhar Dhawan.#DilDilli #Dhadkega pic.twitter.com/LFGMxs1bEk
— Delhi Daredevils (@DelhiDaredevils) November 5, 2018
गेल्या काही दिवसांपासून शिखर धवन हा पुन्हा दिल्लीच्या संघाकडून आयपीएलचे सामने खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. २००८ साली शिखर धवनने दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा IPLमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा प्रवास मुंबईइंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद असा झाला. धवनने आतापर्यंत १४३ आयपीएल सामने खेळले असून त्यात ३३.२६ च्या सरासरीने आणि १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने एकूण ४०५८ धावा केल्या आहेत.