आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगची घोषणा करण्यात आली. भारतीय टेनिसपटू महेश भूपतीची ग्लोबोस्पोर्ट कंपनी या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. टीव्ही, प्रेक्षक आणि खेळाडू या सर्वाचा विचार करून या स्पध्रेचे आयोजन करणार असल्याचे भूपतीने सांगितले. रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे, सेरेना विल्यम्स, राफेल नदाल हे अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला. डिसेंबर २०१४मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, टोकियो, दिल्ली, हाँगकाँग, मनिला, सेऊल, दुबई, जकार्ता, दोहा शहरांचे फ्रँचाइजी असण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघात ६ ते १० खेळाडू असून, एकूण ३० सामने खेळवण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iptl is player tv and spectator friendly bhupathi