संपूर्ण जगासाठी हा एक कठीण काळ सुरू आहे. प्रत्येकजण करोना रोगाचा लढा देत आहे. या साथीचा कोट्यावधी लोकांना फटका बसला आहे. दीड-दोन वर्ष लोक घरात होते. टोकियो ऑलिम्पिक २०२० देखील करोनामुळे पुढे ढकलण्यात आले. अनेक खेळाडू कठोर प्रोटोकॉलच्या दरम्यानही ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त होते.

त्याच वेळी, एक नेमबाज टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीशिवाय करोनामधील लोकांचे प्राण वाचवण्यात व्यस्त होता, परंतु आता या नेमबाजाने सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. इराणचा १० मीटर एअर पिस्तूल ऑलिम्पिक चॅम्पियन जावेद फोरोगी स्वत: देशाचे सैनिक असल्याचे वर्णन करतात. करोना दरम्यान जेव्हा इतर नेमबाज ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त होते, तेव्हा ते रुग्णालयात नर्स म्हणून त्यांच्या भूमिकेत व्यस्त होते.

 

फोरोगी यांचा विक्रम

४१ वर्षीय फोरोगी यांनी शनिवारी २४४.५ गुणांच्या ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले. भारताच्या सौरभ चौधरीनेही स्पर्धेत प्रवेश केला, परंतु पात्रतेमध्ये अव्वल राहिल्यानंतर अंतिम फेरीत त्याला सातवे स्थान मिळवले. फोरोगी म्हणाले, ”पिस्तूल आणि रायफलमधील मी इराणचा पहिला विजेता आहे, याचा मला फार आनंद झाला आहे.”

हेही वाचा – Tokyo 2020 : मनू भाकेरच्या पराभवामागचं मोठं कारण आलं बाहेर, पिस्तुलानंच दिला दगा!

ते म्हणाले, ”मी देशाचा एक सैनिक म्हणून चांगली कामगिरी केली याचा मला खूप आनंद आहे. मी एक नर्स आहे आणि रुग्णालयात काम करतो. विशेषत: करोना साथीच्या वेळी मी रुग्णालयात काम केले. गेल्या वर्षी मी इस्पितळात नोकरी करत असताना देखील मला लागण झाली. आजारातून बरे झाल्यानंतर मी सराव सुरू केला.”

Story img Loader