पाकिस्तान आणि आयर्लंड महिला संघात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत पाकिस्तानने आयर्लंड ३-० ने क्लीन स्वीप केले होते. शनिवारी (आज) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर दोन्ही संघात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आमनेसामने आले होते. या सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-० अशी आघाडी घेतल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १३५ धावा केल्या होत्या. तसेच आयर्लंड संघासमोर १३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आयर्लंडने १८.४ षटकांत ४ गडी गमावून १३९ धावा करत लक्ष्य पूर्ण केले.

दरम्यान १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला झटका दुसऱ्या षटकात बसला. एमी हंटर (१) पहिल्या विकेट्सच्या रुपाने बाद झाली. त्यानंतर आयर्लंड संघाचा डाव सावरताना ओरला प्रेंडरगास्ट आणि गॅबी लुईसने दुसऱ्या विकेट्ससाठी ५५ भागीदारी केली. गॅबी लुईसने आयर्लंडकडून सर्वाधिक ५४ चेंडूत ६९ नाबाद धावा केल्या. त्याचबरोबर ओरला प्रेंडरगास्टने तिला सुंदर साथ देताना २५ चेंडूत ३९ धावा जोड्ल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना निदा दार, नशरा संधू आणि गुलाम फातिमा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांची देखील सुरुवात खराब झाली होती. संघाने ५६ धावांव ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर निदा दार आणि आलिया रिय़ाझ यांनी संघाचा डाव सावरला. आलिया रिय़ाझने २४ धावांचे योगदान दिले. तसेच निदा दारने सर्वाधिक ६१ धावांचे योगदान दिले. तिने ४३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने या धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाने ५ बाद १३५ धावा केल्या होत्या. आयर्लंडकडून गोलंदाजी करताना ओरला प्रेंडरगास्टने सर्वाधिक ३ बळी घेतले.

दुसरा आणि तिसरा टी-२० सामना १४ आणि १६ नोव्हेंबरला खेळवला जाईल. बिस्माह मारूफच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान आणि लॉरा डेलानीच्या नेतृत्वाखालील आयर्लंड खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात त्यांची प्रतिभा, कौशल्य आणि ताकद दाखवण्यास उत्सुक आहेत.
दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत १६ टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात यजमानांनी १३ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये पाहुण्या संघाकडून पराभव स्विकारावा लागला आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या तिरंगी टूर्नामेंटमध्ये या वर्षी जुलैमध्ये या दोन्ही संघांचा टी-२० मध्ये शेवटचा सामना झाला होता.

सध्याच्या आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत, पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे, आयर्लंडपेक्षा चार स्थानांनी पुढे आहे. टी-२० क्रमवारीत, निदा दारला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ऑक्टोबरसाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आले होते. अष्टपैलूंच्या क्रमवारीत सहाव्या आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत १६व्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Fifa World Cup 2022: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वखालील अर्जेंटिनाचा २६ सदस्यीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूंचा आहे समावेश

तुबा हसनला बोटाला दुखापत झाल्यामुळे एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर पडला होती. तिच्या जागी लेग-स्पिनर गुलाम फातिमाचा समावेश करण्यात आला आहे. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात फातिमाने पहिले पाच बळी घेतले होते. ज्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले .

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ireland womens team beat pakistan womens team by 6 wickets in the first t20 match vbm
Show comments