हार्दिक पंडय़ा आणि इरफान पठाण यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर बडोद्याने गुजरातवर ४ विकेट राखून आरामात विजय नोंदवला. पंडय़ा आणि इरफान या जोडीने आधी आपल्या भेदक मार्याच्या बळावर गुजरातचा डाव फक्त ७९ धावांत गुंडाळयाची किमया साधली. त्यानंतर या जोडीने चौथ्या विकेटसाठी ६५ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी रचून बडोद्याच्या विजयाचा अध्याय लिहिला. पंडय़ाने ४६ चेंडूंत ६ चौकारांसह ३७ धावा केल्या, तर इरफानने ३० चेंडूंत १ चौकारासह २१ धावा केल्या. युसूफ पठाणने विजयी षटकार ठाकून बडोद्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : १९.३ षटकांत सर्व बाद ७९ (स्मिथ पटेल २६, जेसल कारिया १८; इरफान पठाण ३/१७, हार्दिक पंडय़ा ३/७) पराभूत वि. बडोदा : १७.२ षटकांत ४ बाद ८२ (हार्दिक पंडय़ा ३७, इरफान पठाण नाबाद २१; कमलेश ठाकूर २/२१)
गुण : बडोदा ४, गुजरात ०.

Story img Loader