Irfan Pathan inswinger clean bowled Younis Khan video viral :: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४च्या फायनल सामन्यात भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात ट्रॉफीवर नाव कोरले. या सामन्यात माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने पुन्हा एकदा १८ वर्षांपूर्वीची आठवण ताजी केली आहे. इरफान पठाणने पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार युनूस खानचा एका शानदार इनस्विंगर चेंडूने क्लीन बोल्ड केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शनिवारी इरफान पठाणने बर्मिंगहॅममध्ये युनूस खानला टाकलेल्या इनस्विंग चेंडूने २००६ च्या कराची कसोटीची आठवण करून दिली. १८ वर्षांपूर्वी इरफान पठाणने आपल्या इनस्विंगर चेंडूने युनूस खानला एलबीडब्ल्यू आऊट केले होते. त्याच वेळी, आता इरफान पठाणने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत हाच इनस्विंग चेंडू टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. २००६ च्या कराची कसोटीत इरफान पठाणने पहिल्याच षटकात सलमान बट (०), युनूस खान (०) आणि त्यानंतर मोहम्मद युसूफ (०) यांना सलग चेंडूंवर बाद करून हॅट्ट्रिक घेतली होती.

Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
N Jagadeesan smashed 6 fours off 6 balls against Aman Shekhawat during RAJ vs TN match Vijay Hazare Trophy
N Jagadeesan : ६ चेंडू, ६ चौकार… एन.जगदीशनचा अनोखा विक्रम, VIDEO होतोय व्हायरल

इरफान पठाणची सोशल मीडियावर चर्चा –

इरफान पठाणच्या या जादुई चेंडूची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे, ज्यावर त्याने पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार युनूस खानला क्लीन बोल्ड केले. इरफान पठाणच्या या चेंडूला युनूस खानकडे उत्तर नव्हते. युनूस खान ११ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीत इरफान पठाणच्या गोलंदाजीत जी धार होती तीच आताही दिसली.

हेही वाचा – IND vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या आता कधी होणार सामने?

भारतीय चॅम्पियन्स संघाने जिंकली ट्रॉफी –

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४ स्पर्धेच्या फायनल सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. यासह युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय चॅम्पियन्स संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफीवर कब्जा केला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानी चॅम्पियन्सचा संघ १५६ धावा करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली. रॉबिन उथप्पा आणि सुरेश रैना एकाच षटकात बाद झाले.

त्यानंतर अंबाती रायडू आणि गुरकीरत सिंग यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. रायुडूने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. गुरकीरत सिंगने ३४ धावांचे योगदान दिले. अखेरीस युसूफ पठाणने भारत चॅम्पियन्ससाठी १६ चेंडूत ३० धावा केल्या. युवराज सिंग १५ धावा करून नाबाद राहिला.

हेही वाचा – IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

इरफान पठाणने चौकार मारून भारतीय चॅम्पियन्सला विजय मिळवून दिला. भारतीय चॅम्पियन्सने अशा प्रकारे फायनल सामन्यात जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव केला. भारतीय चॅम्पियन्सचा सलामीचा फलंदाज अंबाती रायुडूला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. भारतीय चॅम्पियन्ससाठी, अंबाती रायडूने अंतिम सामन्यात ३० चेंडूत ५० धावा केल्या. अंबाती रायडूने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले.

Story img Loader