भारताचा माजी डावखुरा गोलंदाज इरफान पठाण याने एका ट्विटने  सर्वांचे मन जिंकले आहे. एका चाहत्याने इरफानची क्रिकेट कारकीर्द संपवण्यात महेंद्रसिंग धोनीचा हात असल्याचे ट्विट केले आणि महेंद्रसिंग धोनी व तत्कालीन संघ व्यवस्थापनाला शाप दिला. त्यावर इरफानने एका वाक्यात दिलेलं उत्तर समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा एक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक आहे. एकदिवसीय आणि टी२० प्रकारात तो तीन आयसीसी चषक जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. कर्णधार म्हणून त्यांनी अनेक कठोर निर्णयही घेतले. यामुळे त्यांना लोकांच्या नजरेत खलनायक बनावे लागले. केवळ चाहतेच नाही तर त्याच्या माजी सहकाऱ्यांनीही त्याला उघडपणे फटकारले. यात आधी युवराज सिंग, हरभजन सिंग, गौतम गंभीर आणि आता इरफान पठानच्याही निवृत्तीला तो जबाबदार असल्याचेही बोलले जात आहे. माहीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी, इरफान पठाणसारख्या प्रतिभावान खेळाडूची कारकीर्द संपुष्टात आणल्याबद्दल लोक त्याच्यावर आरोप करत आहेत.

हेही वाचा :  ICC Women’s ODI rankings: मंकडिंग पद्धतीने बाद करणारी दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप 

अलीकडेच एका चाहत्याने ट्विट केले की, ‘जेव्हाही मी इरफान पठाणला या लोकांमध्ये पाहतो तेव्हा मी एमएस धोनी आणि त्यावेळेच्या त्याच्या व्यवस्थापनाला दोष देतो. इरफानने वयाच्या २९ व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता, यावर माझा विश्वास बसत नाही. हे अजिबात योग्य नाही. कोणत्याही संघाला इरफान पठाणला सातव्या क्रमांकासाठी घ्यायला आवडेल, पण भारताने जड्डू, अगदी बिन्नीला देखील त्याच्यापेक्षा वरची संधी दिली.”

हे ट्विट वाऱ्यासारखे पसरत होते. पठाणचे चाहते रिट्विट करत होते. कमेंट्सचा पूर आला होता. जेव्हा हे ट्विट जगभरात पाहिले गेले तेव्हा इरफान पठाणने रिट्विट करत उत्तर दिले. पठाणने लिहिले की, “यासाठी कोणाला दोष देऊ नका. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.’ ती चाहत्याची वैयक्तिक टिप्पणी आहे. त्याच्याशी माझा कोणताही संबध नाही. कोणतीही नकारात्मक टिप्पणी करण्याऐवजी इरफान पठाणची ही वृत्ती त्याच्या चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे.”

Story img Loader