क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ असून तो खिलाडूवृत्तीनेच खेळला गेला पाहिजे पण, तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपविण्याचा प्रयत्न करत आहात अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बीसीसीआयला सुनावले आहे.
बीसीसीआयचे प्रमुख आणि सट्टेबाजी प्रकरणातील आयपीएल संघाचे मालक या नात्याने हितसंबधांवरून निर्माण होणाऱया प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्ही द्यायलाच हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने फिक्सिंग प्रकरणात सहभाग नसल्याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास मंजुरी देण्याची मागणी करणाऱया श्रीनिवासन यांना सुनावले.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या प्रकणात सट्टेबाजीचा आरोप असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पनवर कारवाई करणे शक्य आहे का? अशी विचारणा देखील सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला केल्याचे समजते. तसेच याप्रकरणी एन.श्रीनिवासन यांचा समावेश नसणारी समिती स्थापन करण्यात यावी आणि बीसीसीआयने मुद्गल समितीच्या अहवालावर योग्य पावले उचलावीत, असेही न्यायालयाने बीसीसीआयला सांगितले आहे. दरम्यान, मुद्गल समितीच्या अहवालावर योग्य पावले उचलली जातील असे बीसीसीआयने न्यायालयासमोर म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा