ICC ODI World Cup 2023, India vs Pakistan: या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक २७ जून रोजी जाहीर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अहमदाबादच्या मैदानावर भारतासोबत सामना खेळण्यास संमती दिली आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघ बंगळुरू आणि चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध आपले सामने खेळणार आहे. बीसीसीआय २७ जून रोजी मुंबईत ११.३० वाजता एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयसीसी विश्वचषक २०२३चे यजमानपद मिळाले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात हे शेड्युल रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये साखळी सामना खेळण्यास होकार कसा दिला? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. आयसीसी विश्वचषक २०२३चे तात्पुरते वेळापत्रक आधीच मीडियामध्ये प्रसिद्ध झाले असून त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

हेही वाचा: Ishant Sharma: इशांत शर्माने भारताच्या ‘या’ गोलंदाजाला जेम्स अँडरसनपेक्षा सांगितले सरस; म्हणाला की, “भारतातील खेळपट्ट्यांवर…”

आधी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डकपच्या वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही हे यातून स्पष्ट होते. याशिवाय पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूमध्ये खेळायचा आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तीन सामन्यांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात अहमदाबादमध्ये स्पर्धा व्हावी अशी पीसीबीची इच्छा नव्हती. तसेच, पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंतीही केली होती. आता बातमी येत आहे की, पाकिस्तानने अहमदाबादमध्ये भारत विरुद्धचा सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, “मंगळवारी वेळापत्रक जाहीर केले जाईल, हा आयसीसीचा कार्यक्रम आहे, पाकिस्तानने वेळापत्रक मान्य केले आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे, होय, पीसीबीने बदलाची मागणी केली होती, मात्र कोणताही बदल होणार नाही. हा या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे, त्यामुळे आयसीसी याला असे जाऊ देत नाही. यानंतरची मोठी स्टेडियम लखनऊ आणि कोलकात्यात आहेत. यजमान संघाकडे हक्क होता आणि सामना इथेच करायचा निर्णय घेतला.” २७ जूनपासून या मेगा टूर्नामेंटसाठी १०० दिवसांचे काउंटडाऊन सुरू होणार आहे.

हेही वाचा: Sunil Gavaskar: एम.एस. धोनी नाही तर ‘हा’ दिग्गज खेळाडू आहे सुनील गावसकरांच्या मते ओरिजिनल ‘कॅप्टन कूल’

आयसीसी विश्वचषक २०२३ची सुरुवात ५ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यानंतर ११ ऑक्टोबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. भारताचा तिसरा सामना पाकिस्तानशी, तर चौथा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे. २२ ऑक्टोबरला भारताला धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना २९ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये होणार आहे. २ नोव्हेंबरला मुंबईत भारताचा क्वालिफायर सामना होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ५ नोव्हेंबर रोजी कोलकात्यात होणार आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना ११ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे.