Team India on Rohit Sharma Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मावर जोरदार टीका होत आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्मा कर्णधार म्हणून जाणार असला तरी त्याच्यावर खूप दडपण असेल. विंडीजमधील दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहितच्या फलंदाजीवर सर्वांची नजर असेल. पोर्ट ऑफ स्पेन किंवा डॉमिनिकामध्ये मोठी खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला तर त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. मात्र, त्यादरम्यान रोहितला कर्णधार व्हायचेच नव्हते अशी चर्चा सुरु त्यात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने भर टाकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल कर्णधारपद स्वीकारण्यास तयार नव्हता

नाव न सांगण्याच्या अटीवर इनसायडर स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला तेव्हा रोहित सुरुवातीला ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हता. त्याचे फिटनेस सहकार्य करेल की नाही हे त्याला माहीत नव्हते. त्याचवेळी के.एल. राहुल दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून प्रभावित करू शकले नाहीत. त्यावेळचे दोन प्रमुख व्यक्ती माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी राहुल अयशस्वी झाल्यानंतर रोहितला भूमिका स्वीकारण्यास सांगितले होते.”

आगामी WTC सायकलमध्ये रोहित कर्णधारपद सोडणार!

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, “रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याच्या या निराधार चर्चा आहेत. तो संपूर्ण दोन वर्षांच्या WTC सायकलसाठी कर्णधार असेल का? २०२५ मध्ये तिसरी आवृत्ती संपेल तेव्हा त्याचे वय सुमारे ३८ असेल त्यामुळे तो किती दिवस कर्णधार असेल? हा एक मोठा प्रश्न आहे. रोहितला त्याचे शरीर ही जबाबदारी पेलण्यासाठी किती तयार आहे, याबाबत त्यालाही शंका होती आणि म्हणून तो सुरुवातीला कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी तयार नव्हता. या क्षणी मला विश्वास आहे की शिव सुंदर दास आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोन कसोटीनंतर आणि त्याचा फलंदाजीचा फॉर्म बघून निर्णय घ्यावा लागेल.”

हेही वाचा: Rohit Sharma: रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर टांगती तलवार, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाला मिळू शकते नवे नेतृत्व

रोहितने आपल्या कर्णधार असताना एकच चांगली खेळी खेळली

नागपूरच्या आव्हानात्मक ट्रॅकवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शानदार १२० धावा वगळता रोहितने फारशी चांगली खेळी केली नाही. रोहितने २०२२ मध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले. तो कर्णधार झाल्यानंतर भारताने १० कसोटी सामने खेळले. यादरम्यान रोहित वेगवेगळ्या कारणांमुळे तीन सामने खेळू शकला नाही.

कोहलीने मागील १० कसोटीत ५१७ धावा केल्या आहेत

कर्णधार म्हणून रोहितने सात कसोटीत ३९० धावा केल्या. ११ डावात त्याची सरासरी ३५.४५ इतकी होती. शतकाशिवाय त्याला ५० किंवा त्याहून अधिक धावांची एकही खेळी खेळता आली नाही. रोहित कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीने सर्व १० कसोटी खेळल्या. त्याने १७ डावात ५१७ धावा केल्या. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “विराटने असा आळशीपणा केला…”, कोहलीच्या स्लिप फिल्डिंगवर माजी खेळाडू मोहमद कैफने केली टीका

पुजारा मोठ्या संघांविरुद्ध अपयशी ठरला

चेतेश्वर पुजाराने एकाच टप्प्यात आठ कसोटी सामने खेळले आणि १४ डावात ४०.१२च्या सरासरीने ४८२ धावा केल्या. त्याने ९० आणि १०२ धावांची खेळी खेळली. दोन्ही खेळी बांगलादेशविरुद्ध खेळल्या होत्या, जो दुबळा संघ असल्याचे म्हटले जाते. निवडकर्त्यांना माहित आहे की ३५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले हे तीन खेळाडू पुढील तीन वर्षे क्रमवारीत शीर्षस्थानी एकत्र राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना कठीण निर्णय घ्यावे लागतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is rohit sharma didnt want to be captain debate after the wtc debacle what is the real issue find out avw