सातत्य टिकवून ठेवण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने नेटमध्ये कसून सराव करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्शने दिला आहे.
भारताच्या वेगवान माऱ्याचे विश्लेषण करताना जमकाचा ५२ वर्षीय खेळाडू वॉल्श म्हणाला, ‘‘इशांतने नेट्समध्ये कसून सराव केल्यास त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उच्च दर्जाचे सातत्य टिकवून ठेवण्याची नितांत आवश्यकता असते.’’

Story img Loader