वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर इशान किशन भारतात परतला आहे. भारतात येताच इशान किशनने सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमच्या स्टुडिओमध्ये हेअरकट केला आहे. इशान किशनच्या नवीन हेअरकटची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. इशान किशनने एमएस धोनीची कॉपी केल्याचं काही क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे.

इशान किशनचा नवीन हेअरकट पाहिल्यानंतर काही चाहत्यांना एमएस धोनीची उणीव भासत आहे. कारण इशानने माहीच्या हेअरकटची कॉपी केली आहे. धोनीने आयपीएल २०२१ च्या अशाच प्रकारची हेअरस्टाईल केली होती. यावरून नेटकरी धोनीला ‘आदिदास’ (ओरिजनल ब्रँड) आणि इशानला ‘अबीबास’ (बनावट ब्रँड) म्हणत खिल्ली उडवताना दिसत आहे. तर “थालाने इशानला चुकीचा सल्ला दिला”, असंही एकाने म्हटलं आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Pathri Constituency, Suresh Warpudkar,
बंडखोरीवरून वरपूडकर- बाबाजानी यांच्यात कलगीतुरा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

इशान किशनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलग चार अर्धशतके झळकावली होती. मात्र टी-२० मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे, शुक्रवारपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी इशानची संघात निवड करण्यात आली नाही. आता सर्वांना आशिया चषक २०२३ मध्ये इशान किशनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत इशान किशन आणि शुबमन गिलच्या अनुपस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. केवळ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याने टीम इंडियाला टी-२० विश्वचषक जिंकण्यात मदत होणार नाही, असं आकाश चोप्राने म्हटलं.