Ishan Kishan breaks Virat Kohli and Ajinkya Rahane’s record: आशिया कप २०२३ मधील तिसरा शनिवारी (२ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा डाव ४८.५ षटकांत २६६ धावांवर आटोपला. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले. या सामन्यात इशान किशनने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात इशान किशन पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय आघाडीची फळी तुटत असताना, संयमाने खेळून काय करता येते, हे इशानने दाखवून दिले. इशान किशनने या सामन्यात ८२ धावांची खेळी करत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा विक्रम मोडला.

इशान किशनने मोडला विराट कोहलीचा विक्रम –

भारतासाठी, इशान किशनने वनडेच्या पहिल्या १७ डावांमध्ये धावा करण्यात दुसरे स्थान गाठले, जेथे विराट कोहली आधी उपस्थित होता. इशान किशनने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या १७ डावात ७७६ धावा केल्या आहेत आणि त्याने कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे, ज्याने त्याच्या पहिल्या १७ एकदिवसीय डावात ७५७ धावा केल्या होत्या. या यादीत शुबमन गिल ७७८ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानचे माजी पीएम शाहबाज शरीफने ट्विट करून भारतीय फलंदाजांची उडवली खिल्ली, जाणून घ्या काय म्हणाले?

पहिल्या १७ एकदिवसीय डावानंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

७७८ धावा – शुबमन गिल
७७६ धावा – इशान किशन
७५७ धावा – विराट कोहली
७५० धावा – श्रेयस अय्यर
७३९ धावा – नवज्योत सिद्धू
७०० धावा – शिखर धवन

इशान किशनने अजिंक्य रहाणेला टाकले मागे –

आशिया चषक स्पर्धेत पदार्पणाच्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इशान किशन तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे अजिंक्य रहाणे पहिल्या स्थानावर आहे. रहाणेने आशिया कपमधील पदार्पणाच्या सामन्यात ७३ धावांची खेळी केली होती, पण इशानच्या ८२ धावांच्या खेळीने त्याला चौथ्या स्थानावर ढकलले. आशिया कपमध्ये भारताच्या पदार्पणाच्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे, ज्याने १०९ धावा केल्या आहेत, तर सुरेश रैना १०१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Virat Kohli Sand Art: पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर साकारली किंग कोहलीची प्रतिमा, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

आशिया चषकाच्या पहिल्या डावातील भारताची सर्वोच्च धावसंख्या –

१०९ धावा – एमएस धोनी
१०१ धावा – सुरेश रैना
८२ धावा – इशान किशन
७३ धावा – अजिंक्य रहाणे
६९ धावा – राहुल द्रविड
६० धावा – केएल राहुल</p>

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan breaks virat kohli and ajinkya rahanes record with 82 against pakistan in asia cup 2023 vbm