Ishan Kishan New Look Video Viral: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आहे. या व्हिडीओ युवा खेळाडू इशान किशनच्या नवीन हेअरस्टाइलचा आहे. ज्यामध्ये तो नवीन लूकवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच इशान किशनची हेअर स्टाइल पूर्णपणे बदलली आहे. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इशान किशनचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल –

इशान किशनने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, इशान किशनचा नवा लूक सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ आणि फोटोमध्ये इशान किशनची हेअरस्टाईल परदेशी मुलापेक्षा कमी दिसत नाही. अलीकडेच विराट कोहली, शुबमन गिल यांसारख्या स्टार्सनी अमेरिकेत केस कापले. पण इशान किशनची हेअरस्टाईल बघता बघता व्हायरल झाली आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘नंबर-1’ लिहिले आहे.

हार्दिक पांड्याने त्याच्या या फोटोवर फायर ऑफ स्टिकरसह कमेंट केली आहे. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीने कमेंटमध्ये इशान किशनला ‘काटेरी जंगली उंदीर’ म्हटले आहे. त्याचवेळी इशानची हेअरस्टाईल पाहून काही चाहते त्याला कोंबडा म्हणत आहेत.

इशान किशन वेस्ट इंडिज दौऱ्यावरून नुकताच परतला –

विशेष म्हणजे इशान किशन याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दिसला होता. कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने एकदिवसीय प्रकारातही चमकदार कामगिरी केली. इशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन सामन्यांत पन्नास धावांचा टप्पा पार केला. या मालिकेनंतर इशान किशनची जागा यशस्वी जैस्वालने घेतली. मात्र या मालिकेता भारताला ३-२ पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – IND vs IRE: टी-२० मालिकेपूर्वी नेट्समध्ये जसप्रीत बुमराहने पाडला यॉर्कर्स आणि बाउन्सरचा पाऊस, पाहा VIDEO

टीम इंडिया सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात भारतीय संघांत मोठ्या प्रमाणात युवा खेळाडूंचा भरणा आहे. मात्र या दौऱ्यात इशान किशनला संधी देण्यात आली नाही. तो आता त्याच्या नव्या लूकमुळे सतत चर्चेत आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.