Ishan Kishan Smashes Century in Buchi Babu Trophy 2024: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. सध्या इशान बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत खेळत असून झारखंड संघाचा कर्णधार आहे. या स्पर्धेत त्याने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात जबरदस्त खेळी करत शानदार शतक झळकावले. इशानचे शतक आणखी खास ठरले कारण त्याच्या संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशानसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे आणि सुरूवातीलाच त्याने शतकी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Vinesh Phogat Coach: “त्या रात्री तिचा जीव गेला असता…” विनेश फोगटच्या कोचने अंतिम फेरीपूर्वी वजन कमी करतानाचा सांगितला प्रसंग

बूची बाबू स्पर्धेत झारखंडविरुद्ध मध्य प्रदेश सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश संघ २२५ धावा करत ऑल आऊट झाला. ९१.३ षटकांमध्ये मध्य प्रदेशकडून शुभम कुशवाहाने सर्वाधिक ८६ धावांची खेळी खेळली. तर अरहम अकीलने ५७ धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. यानंतर झारखंडकडून इशान किशनने एक जबरदस्त खेळी केली. इशान किशनशिवाय या संघातील अन्य कोणताही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. इशान किशनने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या ८६ चेंडूत शतक झळकावले. इशानने आपले शतक पूर्ण केले तोपर्यंत संघाने २२५ हून अधिक धावा केल्या होत्या. म्हणजे यासह संघाने आघाडी घेतली होती. इशान किशनने लागोपाठ दोन षटकार मारत आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा – WI vs SA Test: पहिल्याच दिवशी दाणादाण; १३ वर्षांनी गयानात टेस्ट आणि दिवसभरात १७ विकेट्स

या सामन्यात इशान किशन ९२ धावांवर खेळत असताना त्याने सलग २ षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत खेळताना दिसला. किशनने ३९ चेंडूंमध्ये नऊ षटकार लगावले आणि ८६ चेंडूंमध्ये त्याने शतक पूर्ण करत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेरीस इशान ११० चेंडूत ११४ धावांवर बाद झाला, या डावात त्याने ५ चौकार आणि १० षटकार लगावले. इशान किशन बराच काळ देशांतर्गत क्रिकेट खेळला नव्हता, पण जेव्हा तो परतला तेव्हा त्याने आपल्या खेळीने खळबळ उडवून दिली. इशान किशन गेल्या बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे आणि बीसीसीआयने त्याला वार्षिक करारातून वगळले होते. यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावून भारतीय निवडकर्त्यांना उत्तर दिले.

हेही वाचा – Andrew Flintoff: “भयंकर स्वप्नं पडतात, रडू कोसळतं, मला मदतीची गरज आहे पण…”, इंग्लंडच्या खेळाडूने सांगितली अपघातानंतरची भावुक कहाणी

भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संघाची घोषणा केली जाईल, असे मानले जात आहे. याआधी खेळाडूंना चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची मोठी संधी आहे. इशान किशनचे भारतीय संघात पुनरागमन होणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.