भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला होता. या निर्णायक सामन्यातील नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
आजच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, पृथ्वी शॉ याला तिन्ही सामन्यात बाकावरच बसवून ठेवले गेले. फिरकीपटू युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करत उमरान मलिकला संधी दिली गेली. मागील सामन्यात युजवेंद्रने भारताकडून टी२०त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला होता आणि आज त्याला बाहेर केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय मधील दोन द्विशतकवीर इशान किशन आणि शुबमन गिल टी२० मध्ये सतत फ्लॉप होत होते. यानंतरही संघ व्यवस्थापनाने त्याला पुन्हा एकदा सलामीच्या फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र किशनला त्याचा फायदा उठवता आला नाही.
दुसऱ्याच षटकात इशान बाद झाला
भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात इशान किशन बाद झाला. न्यूझीलंडच्या कर्णधाराने त्याच्याविरुद्ध ऑफ-स्पिनर मायकेल ब्रेसवेलला गोलंदाजी दिली. शुबमन गिलने पहिल्याच चेंडूवर एकेरी घेतली. दुसरा चेंडू सरळ होता पण इशान टर्नसाठी खेळला. तो थेट त्याच्या पॅडवर आदळला. न्यूझीलंडच्या आवाहनावर अंपायरने बोट वर केले. इशान किशनने डीआरएस घेतला पण तो बाद असल्याचे त्यालाही माहीत होते आणि निर्णय येण्यापूर्वीच तंबूत परतायला लागले. त्याच्या बॅटमधून फक्त एक धाव आली.
इशानच्या बॅटमधून धावा सध्या येत नाहीत
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलची बॅट सातत्याने शांत असते. १४ जून २०२२ रोजी, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मध्ये शेवटचे अर्धशतक केले. त्या सामन्यापासून इशानने १४ सामन्यात १४.२८ च्या सरासरीने २०० धावा केल्या आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी ३७ धावांची होती. गेल्या ५ सामन्यांमध्ये इशानला ४ वेळा दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही.
कसोटी संघाचा देखील एक भाग आहे
याच महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इशान किशन भारतीय संघाचा भाग आहे. मात्र या फॉर्मनंतर बाहेर बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या अनुपलब्धतेमुळे इशानची संघात निवड करण्यात आली आहे.