Ishan Kishan And Rovman Powell IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाला २ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्याचवेळी, या सामन्यात इशान किशनने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलविरुद्ध विकेट किपिंगदरम्यान आपला स्मार्टनेस दाखवत त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, दुसऱ्या टी२० मध्ये, इशान किशनला वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलला किपिंगदरम्यान अतिशय अनोख्या पद्धतीने बाद करण्याची शक्कल लढवली, ज्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. युजवेंद्र चहलच्या षटकात हा सर्व प्रकार घडला. युजवेंद्र चहलने पॉवेलला चेंडू फेकला जो वाइड गेला, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कीपिंग करणार्‍या इशानने चेंडू पकडला आणि पॉवेलचा पाय हवेत जाण्याची किंवा क्रीजच्या बाहेर जाण्याची वाट पाहत राहिला, जेणेकरून त्याला स्टंपिंग करून बाद करता येईल.

हेही वाचा: BCCI Media Rights: टीम इंडियामुळे BCCIला होणार कोट्यवधींचा फायदा, टीव्ही-डिजिटल हक्क विकून करणार बंपर कमाई

इशान पॉवेलचा तोल कधी जातो याची वाट पाहत होता. तितक्यात काही वेळात पॉवेलने क्रीजमध्ये परत जाण्यासाठी पाय हवेत उंचावला आणि इशानने ती संधी साधून स्टंपवरील बेल्स उडवल्या. इशानच्या आउटच्या अपीलवर लेग अंपायरने तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. रिप्लेमध्ये पाहिले असता पॉवेलने पाय वर करून पुन्हा ठेवल्याचे दिसून आले, त्यानंतर इशानने बेल्स उडवल्या होत्या. अशाप्रकारे पॉवेल नाबाद राहिला आणि इशान किशनचा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही. मात्र त्याच्या या चाणाक्ष पणाची सोशल मीडियामध्ये जोरदार कौतुक होत आहे.

हेही वाचा: IND vs WI 2nd T20: टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या संतापला; म्हणाला, “फलंदाजांनी जर खेळपट्टीचा…”

सामन्यात काय झाले?

या सामन्यात भारताने ७ विकेट्सच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युतरात विंडीजने १८.५ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केल्याने तिलक वर्माने अर्धशतक वाया गेले. विंडीजकडून पूरनने सर्वाधिक ६७ धावा केल्या. त्याच्या खालोखाल शिमरॉन हेटमायरने २२, कॅप्टन पॉवेल २१ धावा केल्या, तर शेवटच्या सामन्यात अकिल हुसेनने नाबाद १६ आणि अल्झारी जोसेफने नाबाद १० धावा करून विंडीजला २ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयाने वेस्ट इंडीजने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे नाहीतर टीम इंडियाला ही मालिका गमवण्याची नामुष्की येऊ शकते. २००४ नंतर भारताने वेस्ट इंडीजमध्ये कुठल्याच क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये मालिका गमावलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan played a cunning mind against the west indies captain but failed understand from the video avw