भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. मंगळवारी (२ ऑगस्ट) पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. ४४ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी करणारा सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यानंतर, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी २० फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सामना संपल्यानंतर ईशान किशनने सूर्यकुमार यादवची एक छोटीशी आणि मजेशीर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ईशान किशन सूर्याकुमारचा चांगला मित्र आहे. ईशान किशनची सूर्युकमारची पत्नी देवीशादेखील चांगली मैत्री आहे. तिला केंद्रस्थानी ठेवून ईशानने सूर्याला एक मजेशील प्रश्न विचारला. या प्रश्नाने सूर्याची मात्र धर्मसंकटात सापडल्यासारखी स्थिती झाली होती. पण सूर्यकुमारने एका ‘आदर्श’ पतीप्रमाणे उत्तर देऊन, वेळ मारून नेली.

इंग्लंड दौऱ्यापासून सूर्यकुमारची पत्नी देवीशा त्याच्या सोबत आहे. तेव्हापासून आतापर्यंत दोन सामने वगळता तिने सूर्याचा प्रत्येक सामना स्टेडियममध्ये उपस्थित राहून बघितला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दोन सामन्यांत देवीशा मैदानात येऊ शकली नाही त्या दोन्ही प्रसंगी सूर्यकुमारने मोठी खेळी केली. गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिजवर सूर्याने शतक झळकावले. मंगळवारीही जेव्हा त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सामना जिंकणारे अर्धशतक झळकावले तेव्हा त्याची पत्नी देवीशा स्टँडमध्ये उपस्थित नव्हती.

हेही वाचा – शाहरुख खानच्या ‘रायडर्स’चा मुंबईत फेरफटका; मुंबई भेटी मागे आहे ‘हे’ खास कारण

हीच गोष्ट लक्षात घेऊन ईशान किशनने सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारला. “देवीशा वहिनी मैदानात नसताना तुला चांगलं खेळण्याची प्रेरणा मिळते का?” अशा प्रश्न ईशानने केला. या प्रश्नावर सूर्याने मोठ्या हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला, “ती सध्या या देशात माझ्यासोबत आहे. शिवाय मी तिच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला आहे. त्यामुळे ती सतत माझ्यासोबतच असते”.

Story img Loader