भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ९ जून रोजी, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या नवीन जोडीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. अनुभवी सलामीवीरांच्या अनुपस्थितीमध्ये किशन आणि गायकवाड यांनी चांगली कामगिरी केली. ईशान किशनने तर ४८ चेंडूमध्ये ७६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे सलामीवर म्हणून संघात त्याची जागा पक्की होईल का? असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. त्यावर त्याने आपली प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी टवेंटी सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड सोबत डावाची सुरुवात करणाऱ्या ईशानने नियमीत सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्याबाबत नम्रपणे आपली प्रतिक्रिया दिली. ‘संघाचे नियमित सलामीवीर परतल्यानंतर आपल्याला संधी मिळणे फार कठीण आहे. किंबहुना मी तशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल’, असे ईशान म्हणाला आहे. सामन्यानंतर बोलताना ईशान म्हणाला, “राहुल आणि रोहित हे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत आणि त्यांचा अनुभव जास्त आहे. ते संघात परतल्यावर मला डावाची सलामी करण्याची संधी मिळेल, अशी मला अपेक्षाही नाही. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा माझा सर्वोत्तम खेळ करणे फक्त माझ्या हातात आहे. बाकीचे काम निवड समितीचे आहे.”

याशिवाय, ईशानने आपला सहकारी श्रेयस अय्यरची पाठराखणही केली आहे. पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात श्रेयस अय्यरच्या हातून रॅसी व्हॅन डर डुसेनचा झेल सुटला होता. या जीवदानाचा फायदा घेत डुसेनने तुफान फटकेबाजी करत भारताच्या हातीतील विजय हिसकावून नेला होता. याबाबत बोलताना ईशान म्हणाला, “पराभवाचे खापर एकट्या श्रेयसवर फोडणे चुकीचे आहे. तो झेल सुटल्यामुळेच आम्ही सामना गमावला असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. झेल घेऊन सामने जिंकले जातात ही गोष्ट खरी आहे. पण, सर्वस्वी एका खेळाडूला दोष देणे चुकीचे ठरेल. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणात आम्ही कोणत्या चुका केल्या, याचे मूल्यमापन करावे लागेल.”

दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वात चांगल्या संघापैकी एक आहे. गेल्या काही काळापासून आफ्रिकने खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यांचा सामना करण्यासाठी भारतीय संघाला खास रणनीती तयार करावी लागेल, असेही ईशान किशन म्हणाला.