Ishan Kishan Breaks MS Dhoni Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या दुसरा कसोटी सुरू आहे. मात्र, टीम इंडिया या सामन्यात खूप पुढे दिसत आहे. या सामन्यात भारतीय संघाने २ बाद १८१ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. यादरम्यान युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह १५२.९४ च्या स्ट्राइक रेटने अफलातून अर्धशतक (५२*) ठोकले. या अर्धशतकानंतर इशान किशनने ऋषभ पंतचे आभार मानले. तसेच, त्याने माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांचे विक्रम मोडले आहेत.

इशान किशनने ऋषभ पंतचे मानले आभार

इशान किशनने सामन्याचा चौथा दिवस संपल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले की, “येथे येण्यापूर्वी मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होतो आणि ऋषभ पंतही त्याच्या संघात पुनरागमन करण्यासाठी तिथे मेहनत घेत होता.” यादरम्यान ऋषभने इशानला काही गोष्टी सांगितल्या. इशान म्हणाला, “मी याआधी एनसीएमध्ये होतो. पंतही तिथे होते. मी कसा खेळतो? माझी मानसिकता काय आहे? हे सर्व त्याला माहीत आहे. अंडर-१९ पासून आम्ही एकमेकांना ओळखतो. मला कोणीतरी सल्ला द्यावा अशी माझी नेहमीच इच्छा असते आणि सुदैवाने माझ्या फलंदाजीबाबत काहीतरी सांगण्यासाठी तो तिथे होता.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

इशान पुढे म्हणाला, “असे अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत जे गोलंदाजांशी सतत बोलत राहतात. उद्या आपला चांगला खेळ व्हायला हवा. आपल्याला चांगली फलंदाजी करून सामना जिंकायचा आहे, त्यासाठी लवकर विकेट घेणे महत्त्वाचे आहे. टी२० आणि एकदिवसीय प्रकारात मी करिअर करावे हे माझे स्वप्न होते पण त्याहीपेक्षा अधिक मिळाले. यासाठी मी खूप खुश आहे. मला फक्त जाऊन प्रत्येक चेंडू मारायचा होता, असे सांगण्यात आले होते. मुख्यतः मी माझ्या आई-वडिलांचे आभार मानेन कारण की, त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला.”

हेही वाचा: Ishan Kishan: ऋषभच्या बॅटने इशानचे झंझावाती अर्धशतक; सामन्यानंतर म्हणाला, “यारा तेरी यारी को…”, पाहा Video

इशान किशनने एम.एस. धोनीचा विक्रम मोडला

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज इशान किशनने अर्धशतक झळकावले. माहितीसाठी की, किशन त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरा सामना खेळत आहे. आशिया महाद्वीपच्याबाहेर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इशान किशन हा फारूख इंजिनियर ( वि. इंग्लंड, लॉर्ड, १९७१) यांच्यानंतरचा दुसराच भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. इशानने आज धोनीचा विक्रम मोडला अन् कपिल देव, वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमांची बरोबरी केली.

हेही वाचा: IND vs WI: अश्विन ठरला गेम चेंजर! भारत मालिका विजयापासून केवळ आठ विकेट्स दूर, विंडीजसमोर अजूनही २८९ धावांचे आव्हान

कसोटी क्रिकेटमधील इशान किशन या भारतीय यष्टिरक्षकाने ठोकलेले हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. ऋषभ पंतने २८ चेंडूंत श्रीलंकेविरुद्ध २०२२ साली अर्धशतक झळकावले होते. परंतु, किशनने आज एम.एस. धोनीचा पाकिस्तान विरुद्ध ३४ चेंडूत अर्धशतक करण्यचा विक्रम मोडला. भारताकडून ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. कपिल देव यांनी दोन वेळा पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध १९७८ व १९८२ आली हा विक्रम केला होता. अष्टपैलू हरभजन सिंगने इंग्लंड विरुद्ध २००२ साली आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिज विरुद्ध २००६ साली हा पराक्रम केला होता.

Story img Loader