Ishan Kishan Funny Video Viral : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे ड्रेसिंग रुम किंवा मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. एखाद्या खेळाडूचा किंवा संघ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्याचा वाढदिवस असल्यावर तर ड्रेसिंग रुममध्ये खेळाडू धमाल करतात. अशाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडीओ इशान किशनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांच्या तोंडावर केक लावण्यासाठी इशान किशनने शर्थीचे प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण दिलीप यांनीही इशानला चकवा देण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका हॉटेलच्या बॉलरूममध्ये टीम इंडियाचे खेळाडू एन्जॉय करताना दिसत आहेत. टीम इंडियाचा विकेटकीपर आणि युवा फलंदाज इशान किशन दिलीप यांच्या तोंडाला केक लावण्यासाठी त्यांचा पाठलाग करतो. पण फिल्डिंग कोच दिलीप इशानपासून वाचण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. इशान अखेर दिलीप यांना मोठ्या चालाखीने पकडतो आणि त्यांच्या तोंडाला केक लावतो. ज्यांचा वाढदिवस असतो, अशा व्यक्तींना शुभेच्छा देताना मित्रमंडळी थेट तोंडालाच केक लावतात. दिवसेंदिवस हे फॅड वाढताना दिसत आहे. इशान किशननेही दिलीप यांच्या तोंडाला केक लावण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि अखेर तो दिलीप यांना केकेने माखवण्यात यशस्वी झाल.

नक्की वाचा – WPL मध्ये DRS निघाला ब्लंडर! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही…Video पाहून विश्वासच बसणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

इशानने केलेलं हे मजेशीर कृत्य पाहून त्याच्या शेजारी असलेले सर्वजण लोटपोट हसत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. खेळाडूंचे मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर नेहमीच व्हायरल होतात. क्रिकेटप्रेमींनाही अशाप्रकारचे व्हिडीओ पाहण्यात खूप रस असतो. कारण इशानने शेअर केलेल्या या व्हिडीओला ८२ हजारांहून अधिक लाईक मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. इशानने शेअर केलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांसह क्रिकेट चाहत्यांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan tries to put cake on team indias fielding coach t dilip funny video clip goes viral on instagram nss