क्रिकेट वर्ल्डकपची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. टीम इंडिया दिमाखात सेमीफायनलमध्ये दाखल झाली असून तिथे न्यूझीलंडचं आव्हान भारतीय संघासमोर असेल. वानखेडेवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियालाच विजयासाठी पसंती दिली जात आहे. मात्र, एकीकडे सेमीफायनलमधील सामन्याविषयी अंदाज बांधले जात असताना दुसरीकडे नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या सामन्यातील काही प्रसंग सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. आधी विराट कोहलीची विकेट आणि नंतर विराट कोहलीनं घेतलेली विकेट या दोन्ही वेळी स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या अनुष्काचे हावभाव सध्या व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे आता विराट कोहलीचीही एक प्रतिक्रिया तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

भारत विरुद्ध नेदरलँड्सच्या सामन्यात भारतानं तब्बल १६० धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीनं ५१ धावा केल्या. विराटच्या ५०व्या शतकासाठी क्रिकेट चाहत्यांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार असली, तरी त्यानं झळकावलेल्या अर्धशतकामुळे स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. यात आता विराटच्या खेळीदरम्यान मैदानावर त्याला पाणी देण्यासाठी आलेल्या इशान किशनच्या एका कृतीचा फोटो व्हायरल होऊ लागला आहे.

काय आहे या फोटोमध्ये?

रोहित शर्मा ६१ धावांवर बाद झाल्यानंतर मधल्या वेळेत इशान किशन विराट कोहलीला पाणी देण्यासाठी धावत मैदानात आला. त्या वेळचा हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. पण विराटऐवजी स्वत: इशान किशनचच विराटच्या बाजूला उभा राहून पाणी पिताना फोटोमध्ये दिसत आहे.

IND Vs NZ Semi Final: आता ‘नॉकआऊट’ सामना; वानखेडेवर काय आहे भारताचा जय-पराजयाचा इतिहास?

विशेष म्हणजे, ज्या अँगलने हा फोटो काढलाय, त्यावरून विराट कोहली पाणी पिणाऱ्या इशान किशनकडेच बघत असल्याचं दिसत आहे. नेटिझन्समध्ये या फोटोवरून तुफान टोलेबाजी चालू झाली आहे.

एक्सवर (ट्विटर) काही युजर्सनं इशान किशनची बाजू घेतली आहे. “पाण्याच्या बाटलीत पावडर टाकण्यासाठी जागा व्हावी, म्हणून तो पाणी पीत आहे, जेणेकरून पावडर त्यात व्यवस्थित मिसळू शकेल”, असं एका युजरचं म्हणणं आहे.

तर एका युजरनं “विराटसाठी आणलेलं पाणी आधी स्वत: पिऊन स्वत:ची निष्ठा सिद्ध कर”, अशी फिल्मी पोस्ट केली आहे!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan viral photo from ind vs ned world cup match virat kohli standing pmw