विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मंगळवारी सराव सत्रात सहभागी होता आले नाही. परंतु गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इशांत खेळू शकेल, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. परंतु सावधगिरीची उपाययोजना म्हणून बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाला पाचारण करण्यात आले आहे. दिंडा बंगालच्या रणजी संघासोबत होता.
मंगळवारी सकाळी मोटेरा स्टेडियमवर इशांत शर्माशिवाय भारतीय संघाचा सराव झाला. तेव्हा शर्मा सराव सत्रात का सहभागी झाला नाही, याबाबत चर्चा झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय जगदाळे यांनी पहिल्या कसोटी सामन्यात इशांतच्या खेळण्याची आशा प्रकट केली
आहे.
‘‘इशांत शर्माला विषाणूंचा संसर्ग झाला आहे. परंतु भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याआधी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु सावधगिरी म्हणून अशोक दिंडाने अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.’’
भारताला चिंता इशांत शर्माची ; अशोक दिंडा अहमदाबादला रवाना
विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मंगळवारी सराव सत्रात सहभागी होता आले नाही. परंतु गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इशांत खेळू शकेल, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.
First published on: 14-11-2012 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishant fitness worry team india