भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील १५० बळींचा टप्पा गाठला आहे. ऑकलंडमध्ये भारत-न्युझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. ईशांतने त्याच्या कारकिर्दितील ५४ व्या कसोटीत बळींचे दीडशतक साजरे केले असून, भारताकडून अशी कामगिरी करणारा तो ११ वा खेळाडू ठरला आहे. न्युझीलंड दौ-यावर असणा-या भारतीय संघातील झहीर खाननंतर सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून ईशांतकडे बघितले जात आहे. भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणा-या गोलंदाजाचा मान अनिल कुंबळेकडे जातो. त्याने १३२ कसोटी सामन्यांत ६१९ बळी मिळवले आहेत. तर जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असणा-या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ८०० बळी मिळवले असून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७०८ बळी मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हा एकमेव गोलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ईशांतचा १५० बळींचा टप्पा पूर्ण
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील १५० बळींचा टप्पा गाठला आहे. ऑकलंडमध्ये भारत-न्युझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
First published on: 06-02-2014 at 05:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishant reaches 150 wicket mark in test cricket