भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मावर बेशिस्त वर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंडात्मक कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला बाद केल्यानंतर अपशब्द उच्चारल्याबद्दल इशांतच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कपात केली जाणार आहे, अशी माहिती आयसीसीने एका पत्रकाद्वारे दिली.
गाबा येथे झालेल्या कसोटीतील पहिल्या डावात स्मिथला बाद केल्यानंतर शर्माने त्याच्याकडे कटाक्ष टाकीत अपशब्द उच्चारले असल्याचा अहवाल सामनाधिकारी जेफ क्रो यांनी आयसीसीकडे पाठवला होता. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने कमी वेगाने षटके टाकल्याबद्दल स्मिथ याच्यावरही दंडात्मक कारवाई झाली आहे. त्याच्या मानधनातून ६० टक्के रक्कम कपात करण्यात आली.

Story img Loader