Ishant Sharma Reveals About Dhoni Angry on Virat Kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. पण मैदानावरील खेळाडूंवर माहीला राग येतो, असा खुलासा इशांत शर्माने केला आहे. तो चूक केल्यावर ज्या पद्धतीने पाहतो, ते पाहून समजते की तो आपल्यावर रागावला आहे. त्यानंतर इशांत शर्मा पुढे म्हणाला की, माही एकदा विराट कोहली रागावला होता. हा खुलासा वेगवान गोलंदाजाने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये केला आहे. एकदा धोनीने कोहलीला कसे समजवण्याचा प्रयत्न केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेबद्दल इशांत शर्मा म्हणाला, “माही भाईला फारसा राग येत नाही, पण एकदा तो कोहलीवरही रागवला होता. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळत होतो. शिखर धवनचा तो पदार्पणाचा सामना होता. सामन्यातील दुसरा डावात अडचणीत आला होता. कारण शिखर धवन दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकलो नाही.

इशांत पुढे म्हणाला, “त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे कसोटी सामना अडचण निर्माण झाली होती. दुसऱ्या डावात कोहलीही बाद झाला होता, पण हा कसोटी सामना आम्ही जिंकला होता. त्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलच्या लिफ्टमध्ये होतो. तो कोहलीला म्हणाला, आपल्याकडे कमी फलंदाज आहेत, हे माहीत असताना तो फटका मारायची काय गरज होती.”

हेही वाचा – ODI World Cup 2023: केन विल्यमसनने दुखापतीनंतरही मानली नाही हार, विश्वचषक स्पर्धेची करतोय तयारी, पाहा VIDEO

भारताचा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “तिथे धोनीने फारसा राग दाखवला नाही, पण त्याने कोहलीला हे सांगून एक मुद्दा सांगितला आणि त्याचे महत्त्व काय आहे, याची जाणीव करून दिली. माही भाई मला पण खूप काही सांगायचे पण एक मोठा भाऊ म्हणून. माही भाईचा, हा मार्ग आम्हाला समजावण्याचा आणि खेळाडूंना पुढे नेण्याचा आहे.”

इशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०५ सामने खेळले असून या कालावधीत त्याला ३११ विकेट्स घेण्यात यश आले आहे. याशिवाय त्याने ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये ११५ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. इशांतच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ विकेट आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशांतचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishant sharma shared the story of mahendra singh dhoni getting angry on virat kohli vbm