भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दिल्लीच्या संघातून वगळण्याचे वृत्त पसरताच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) सावध पवित्रा घेतला आहे. इशांतने दुसऱ्या सामन्याला उपलब्ध असल्याचे सांगितल्याने त्याची निवड पहिल्या सामन्यासाठी करता आली नसल्याची सारवासारव दिल्लीच्या संघटनेने केली आहे. ‘‘इशांतने दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे,’’ असे डीडीसीएचे क्रीडा सचिव सुनील देव यांनी सांगितले.

Story img Loader