Isle of Man has recorded an embarrassing record: आइल ऑफ मॅनने रविवारी २६ फेब्रुवारीला सर्वात लाजिरवाणा विक्रम केला. कार्ल हार्टमनच्या नेतृत्वाखालील संघ स्पेनविरुद्ध ८.४ षटकांत १० धावांवर बाद होऊन टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारा संघ ठरला. स्पेनने अवघ्या दोन चेंडूत हे लक्ष्य पूर्ण करत १० विकेट्सने विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॅश लीग (BBL) च्या २०२२-२३ आवृत्तीत अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध १५ धावा करणाऱ्या सिडनी थंडरनेही मागे सोडले आहे. आयल ऑफ मॅन संघाचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. जोसेफ बरोजने सात चेंडूत चार धावा करत सर्वाधिक धावा केल्या.

स्पेनकडून आतिफ मेहमूदने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ४ षटकात ६ धावा देत ४ बळी घेतले. मोहम्मद कामरान आणि लॉर्न बर्न्स यांनी अनुक्रमे तीन आणि दोन विकेट घेतल्या.आयल ऑफ मॅनने आंतरराष्ट्रीय टी-२० च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्याही नोंदवली. त्यानी २०१९ मध्ये इल्फोव्ह काउंटीमध्ये झेक प्रजासत्ताक विरुद्ध २१ धावांवर बाद झालेल्या तुर्कीचा चार वर्षांचा विक्रम मोडला.

आयल ऑफ मॅनचा यापूर्वीचा सर्वात कमी स्कोअर ६६ आहे. हा २५ फेब्रुवारी रोजी स्पेनविरुद्ध केला होता. आयल ऑफ मॅनने आतापर्यंत १६ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ जिंकले आहेत. तसेच सात गमावले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. आयल ऑफ मॅनने स्पेनविरुद्धची सहा सामन्यांची टी-२० मालिका ०-५ अशी गमावली.

हेही वाचा – IND vs AUS: हरमनप्रीत कौरच्या धावबादवरुन नवा वाद; एलिसा हिलीने भारतीय कर्णधारावर उपस्थित केला प्रश्न

त्यांनी या मालिकेची सुरुवात ८१ धावांनी पराभव पत्करात केली होती. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे वाया गेला. स्पेनने तिसरा सामना आठ धावांनी जिंकला. तसेच चौथा सामना सहा गडी राखून जिंकत मालिका जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isle of man has recorded an embarrassing record of being all out for 10 runs in a t20 against spain vbm