नेमबाजीतील १० मी. एअर पिस्तूल प्रकारातील विश्वविक्रमावर अखेर भारताच्या हीना सिद्धू-पंडितचे नाव कोरले गेले. तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या विक्रमाची अधिकृत घोषणा आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स महासंघाने (आयएसएसएफ) केली आहे. ६ ते ११ नोव्हेंबरमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये हीनाने अंतिम फेरीत ३८४ गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली होती, तर अंतिम फेरीत तिने २०३.८ गुणांची कमाई केली होती. खेळ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी या स्पर्धेपूर्वी १० मी. एअर पिस्तूल प्रकारातील नवीन नियम अमलात आणले होते. या नवीन विश्वविक्रमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच अधिकृत घोषणा आयएसएसएफने केली असल्याची माहिती महाराष्ट्र रायफल संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे. या देदीप्यमान कामगिरीमुळे हीनाने विश्व क्रमवारीमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

Story img Loader