दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे नेमबाजी विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुता याने सोमवारी आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या नेमबाजी विश्वचषकात भारताचे हे पहिले पदक ठरले आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जुनने टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता लुकास कोझेन्स्कीचा १७-९ असा पराभव केला.

अमेरिकेचा लुकास कोझेन्स्की दुसऱ्या तर इस्रायलचा ३३ वर्षीय सर्गेई रिक्टरने २५९.९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत सहभागी होणारा आणखी एक भारतीय नेमबाज पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. अर्जुनच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पंजाबचा रहिवासी असलेला २३ वर्षीय अर्जुन २०१६ पासून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. याआधी, त्याने ६६१.१ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकच्या सामन्यात स्थान मिळविले होते. वरिष्ठ संघात अर्जुनचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. त्याने कनिष्ठ नेमबाजी विश्वचषकात एका सुवर्णासह एकूण तीन पदके जिंकलेली आहेत.

Story img Loader