सध्याचा भारताचा सर्वात फॉर्मात असलेला विराट कोहली तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे यात शंका नाही परंतु, कोहलीशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱया इच्छुक तरुणींना सध्या वाट पाहावी लागणार आहे. कारण, विराटची आई सरोज कोहली यांनी विराटच्या लग्नासाठी घाई केली जाणार नाही. अजून तो लहान आहे असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तडफदार खेळी करणाऱया विराटला त्याच रात्री इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियन वेटने ट्विटरवरून लग्नाची मागणी घातली. याबाबत विराटची आई सरोज कोहली यांना विचारले असता, विराट अजून लहान आहे आणि त्याच्या लग्नाच्या बाबतीत घाई केली जाणार नसल्याचे म्हटले.
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील लढत पाहून डॅनियल विराटच्या प्रेमातच पडली, पण एवढय़ावर ती थांबली नाही तर तिने ‘ट्विटर’च्या माध्यमातून विराटला ‘कोहली, मॅरी मी’ अशी चक्क लग्नासाठी विचारणा केली. विराट आणि अनुष्का यांनी आपण फक्त चांगले मित्र असल्याचे सांगत आपल्या प्रेमसंबंधांविषयी नकार दिला होता. पण आता डॅनियलने यामध्ये उडी घेत या पटकथेला त्रिकोणी वळण दिले. आता यावर कोहलीकडून काय उत्तर येते, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
विराट अजून लहान आहे- डॅनियलच्या ‘त्या’ ट्विटवर कोहलीच्या आईची प्रतिक्रिया
कोहलीशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱया इच्छुक तरुणींना सध्या वाट पाहावी लागणार आहे. कारण, विराटची आई सरोज कोहली यांनी विराटच्या लग्नासाठी घाई केली जाणार नाही. अजून तो लहान आहे असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
First published on: 07-04-2014 at 05:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is not the right age for him to marry says virat kohlis mother