Indian Primer League Auction 2024, Mitchell Starc: आयपीएल२०२४ साठी मिनी लिलाव सुरू आहे. लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांना २०२३मध्ये टूर्नामेंट जिंकलेल्या संपूर्ण संघापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३मध्ये विजेतेपद पटकावले, त्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले. पण २०२४च्या लिलावात स्टार्क आणि कमिन्स यांना २० कोटींहून अधिक रुपयांना विकत घेण्यात आले. यानंतर मिचेल स्टार्कने त्याच्यावर लागलेल्या या बोलीवर भावना व्यक्त केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मिचेल स्टार्क म्हणाला, “नक्कीच हा माझ्यासाठी धक्का होता. माझी पत्नी अॅलिसा भारतातील महिला संघाबरोबर आहे त्यामुळे मी स्क्रीनवर जे पाहत होतो त्यापेक्षा तिला लवकर अपडेट मिळत होते. माझ्यापेक्षा ती जास्त आश्चर्यचकित आणि रोमांचित होत होती.” कमिन्सला मिळालेल्या रकमेबद्दल स्टार्क म्हणाला, “आमच्या कसोटी संघाचा व्हॉट्सअॅप ग्रुप पुढे डिनरसाठी वाट बघत आहे. त्यांनी आमचे अभिनंदन करण्यासाठी खास योजना आखली आहे. बॉक्सिंग-डे कसोटी आधी काहीतरी मोठी पार्टी करायची आहे, असे खास पत्र आमच्यासाठी संघाने लिहिले आहे.”
आयपीएलमध्ये खूप काळानंतर मिचेल स्टार्क पुनरागमन करत आहे. काही काळासाठी तो आयपीएलपासून दूर होता. यावर तो म्हणाला की, “हो, खूप काळ मी आयपीएलपासून दूर होतो. मी २०१४-१५ मध्ये आरसीबीमध्ये सहभागी झालो होतो, त्यानंतर २०१८ मध्ये केकेआरने मला सामील केले पण मला त्यावेळी दुखापत झाली होती. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत होतो. मला आयपीएलमध्ये परत यायचे होते मात्र, योग्य संधी मिळत नव्हती. या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियासाठी आयसीसी स्पर्धा जिंकवून देऊ शकलो म्हणून खूप समाधान वाटत आहे. आयपीएलमध्ये एक ऑस्ट्रेलियन म्हणून त्यात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साही आहे. येत्या वर्षात टी-२० विश्वचषक येत असलेल्या, सर्वोत्तम टी-२० लीगमध्ये खरोखर स्पर्धात्मक टी-२० क्रिकेट खेळण्याची, ही चांगली संधी आहे.”
किंमत टॅग बाबत स्टार्कने सूचक विधान केले. तो म्हणाला, “मला अजूनही एवढी मोठी बोली लागली आहे यावर विश्वास बसत नाहीये. मला स्वप्नात देखील वाटले नव्हते की मी एवढी बोली माझ्यावर लागू शकेल. जे हवे आहे किंवा आवश्यक आहे, असे होणे हेच माझ्यासाठी खूप आहे. मी नम्रपणे ही किंमत टॅग स्वीकारतो. मला वाटते की, माझ्या गेमप्लेमध्ये काही गोष्टींव्यतिरिक्त फारसा बदल झालेला नाही. आशा आहे की हा अनुभव काही प्रमाणात यशस्वी होईल. याबद्दल आता आणखी काही सांगता येणार नाही.”
एवढ्या पैशांची काही कल्पना होती का? असा प्रश्न विचारला असता त्याने सूचक विधान केले. तो म्हणाला, “मला याबाबत असे काही होईल, असे वाटले नव्हते. काही संघ त्यांच्या गोलंदाजी आक्रमणांना बळ देण्याचा विचार करत होते पण त्या यादीत अनेक महान गोलंदाज आहेत.” स्टार्क पुढे म्हणाला, “फोनवर काही मेसेज येत होते. केकेआर मधील काही लोकांनी माझ्यावर बोली लावलण्याचा प्रयत्न केला मात्र, काही कारणास्तव यातून त्यांनी माघार घेतली. फक्त कौशल्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर संघाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे, हे मी देण्याचा प्रयत्न करेल.” “पॅट केकेआरमध्ये गेला आहे, पण तो बंगळुरूमध्ये जशी कामगिरी करत होता तशीच कामगिरी आता करेल अशी आशा आहे,” असे केकेआरचे चेअरमन म्हणाले.
स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये मोजून ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला खरेदी केले. स्टार्कची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. कोलकाता आणि गुजरात टायटन्सने शेवटपर्यंत स्टार्कसाठी बोली लावली, त्यात केकेआरचा विजय झाला. स्टार्कला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलचाही चांगला अनुभव आहे. याआधी तो आयपीएलचे दोन सीझन खेळला आहे. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायडर्स हैदराबाद संघाने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले. कमिन्स हा खेळाडू होता ज्याची मूळ किंमत २ कोटी होती. हैदराबादसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही कमिन्ससाठी बोली लावली होती, परंतु आरसीबी संघ त्याला आपला भाग बनवू शकला नाही.