Gautam Gambhir old video viral after IND vs NZ 2nd Test : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण सोपे नाही, हे जगातील दिग्गजांनी मान्य केले आहे. टीम इंडियाच्या फॅन फॉलोइंगच्या प्रकारामुळे, एका चूकीसाठी किंवा पराभवासाठी कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाला टीका सहन करावी लागते. आता ६९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर सर्वजण गौतम गंभीरवर टीका करत आहेत. अशात गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रवी शास्त्रीवर टीका करताना दिसत आहेत. मात्र, आता रवी शास्त्रींनी केलेल्या टिप्पणीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोक गंभीरचा एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामध्ये तो माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीवर टीका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर आता शास्त्रींनीच त्याचा बचाव केला आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये गंभीरने शास्त्री यांच्या कारकिर्दीतील कामगिरीवर कठोर प्रश्न उपस्थित केले होते. आता लोक तो व्हिडिओ शेअर करत आहेत आणि टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला तेच प्रश्न विचारत आहेत. खरे तर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकल्यानंतर शास्त्री म्हणाले होते की, हा आतापर्यंतचा परदेशात विजय मिळणारा सर्वोत्तम भारतीय संघ आहे.

गौतम गंभीर काय म्हणाला होता?

न्यूज १८ ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत गंभीर म्हणाला होता की, “मला खात्री आहे की जे लोक काहीही जिंकले नाहीत ते अशी विधाने करतात. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याशिवाय शास्त्रींनी त्यांच्या कारकिर्दीत काय मिळवले, हे मला माहीत नाही. ते परदेशातील मालिका विजयाचा भाग होते, असे मला वाटत नाही. जर तुम्ही स्वतः काही जिंकले नसेल, तर तुम्ही अशी विधाने करता. मला खात्री आहे की लोकांनी ते गांभीर्याने घेतले नसेल. मला खात्री आहे की त्यांना जुने रेकॉर्ड माहित नसतील किंवा जुन्या मालिका पाहिल्या असत्या, तर त्यांना असे विधान केले नसते.”

हेही वाचा – IND vs NZ : ऐतिहासिक विजयानंतर टॉम लॅथम भारावला, ‘या’ दोन खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय

गंभीरने शास्त्रींवर उपस्थित केले होते प्रश्न –

गौतम गंभीर पुढे म्हणाला होती की, “हे खूपच बालिश होते. तुम्ही ४-१ असा विजय मिळवला असता, तरी तुम्ही परदेश दौऱ्यात विजय मिळवणारा हा सर्वोत्तम भारतीय संघ आहे, असे तुम्ही म्हणाला नसता. तरीही तुम्ही विनम्र राहिले असते आणि आम्ही ते पुढे पण अशी कामगिरी करु, असे म्हणाले असते. आम्ही पुढे पण चांगली कामगिरीत करत राहू आणि आणि आणकी सुधारणा करता राहायचे आहे. हा परदेशातील सर्वोत्तम भारतीय संघ आहे असे तुम्ही म्हणू नका. हे बालिश आहे. मला खात्री आहे की लोकांनी ते गांभीर्याने घेतले नसेल. मला इतर लोकांबद्दल माहिती नाही, परंतु मी ते गांभीर्याने घेतले नाही कारण ते एक अतिशय अपरिपक्व विधान होते.”

हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल

आता रवी शास्त्री गौतम गंभीरबद्दल काय म्हणाले?

रवी शास्त्री यांनी २०१७ ते २०२१ पर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या कोचिंगखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोन ऐतिहासिक कसोटी मालिका जिकल्या होत्या. ज्यामध्ये एक अशी कामगिरी होती, जी यापूर्वी कोणत्याही भारतीय संघाने केली नव्हती. या वर्षाच्या सुरुवातीला गौतम गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली. गंभीरचा करार साडेतीन वर्षांसाठी आहे जो डिसेंबर २०२७ पर्यंत आहे. पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव झाला, तेव्हा कॉमेंट्री करताना रवी शास्त्री गौतम गंभीरबद्दल म्हणाले की, “त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. एवढ्या मोठ्या फॅन फॉलोइंग असलेल्या संघाचे प्रशिक्षक होणे सोपे नाही. त्यांच्या कोचिंग करिअरची ही सुरुवात आहे. ते लवकरच शिकतील.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was very childish gautam gambhir past comments on ravi shastri resurface following india defeat to new zealand old video viral vbm