Nigar Sultana on Harmanpreet Kaur: भारत आणि बांगलादेश महिला एकदिवसीय मालिका नुकतीच संपली. या एकदिवसीय मालिकेतील तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात खराब अंपायरिंगवरून जोरदार वाद झाला आणि शेवटी टीम इंडियाला कटू आठवणी घेऊन बांगलादेश दौरा संपवावा लागला. टी२० मालिका २-१ने जिंकल्यानंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धची वन डे मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवावी लागली. या मालिकेत भारतीय महिला संघ प्रथमच बांगलादेशकडून एकदिवसीय सामना हरला. मात्र, ही मालिका हरमनप्रीतच्या कृतीने गाजली आणि त्यानंतर त्या कृतीबद्दल तिला आयसीसीने मोठी शिक्षा देखील दिली आहे. या शिक्षेवरून आता बांगलादेशची कर्णधार निगर सुलतानाने टीका केली आहे.

मीरपूरमधील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान अंपायरिंगवरून बराच गदारोळ झाला आणि चार भारतीय खेळाडू ज्याप्रकारे बाद झाले त्यावरून टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत संतापलेले दिसली. तिच्या मते तो एलबीडब्ल्यू आऊट द्यायला नको होते. सर्वप्रथम यास्तिका भाटियाला सुलताना खातूनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट करण्यात आले. या निर्णयावर हरमन नाराज होती. यानंतर हरमनप्रीतला एलबीडब्ल्यू करण्यात आले आणि तिने रागाच्या भरात स्टंपवर बॅट फेकून मारली. अमनजोत कौरही स्वतःला एलबीडब्ल्यू आऊट झाल्यामुळे नाराज होती कारण, चेंडू स्टंपच्यावरून जात होता. भारताला विजयासाठी चार चेंडूत एका धावेची गरज असताना, मेघना सिंगला अंपायरने झेलबाद आऊट दिले आणि सामना बरोबरीत सुटला. पण मेघनाचा असा विश्वास होता की चेंडू तिच्या बॅटला लागलाच नाही.

pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Mohammad Rizwan says I want to be the captain of the team not the king
Mohammad Rizwan : ‘मला किंग नव्हे तर…’, पाकिस्तान संघाचा कर्णधार होताच मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य, रोख नेमका कोणाकडे?
Mushfiqul Fazal Ansarey
Mushfiqul Fazal Ansarey: बांगलादेशचे भारतविरोधी राजदूत मुश्फिकूल फजल अन्सारी कोण आहेत? मोहम्मद युनूस सरकारने का केली आहे त्यांची नियुक्ती?
Annu Kapoor recalls on kiss controversy
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
Anup Jalota says salman khan should apologize bishnoi community
“काळवीटाची शिकार केली नसेल तरीही बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन…”, सलमान खानला बॉलीवूडमधून सल्ला
Shreya Bugde And Usha Nadkarni
“सगळे तिला खूप घाबरतात”; श्रेया बुगडे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींविषयी म्हणाली, “ती खूप प्रेमळ…”

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीतला आणखी एक धक्का! BCCIचा आयसीसीने घातलेल्या बंदीच्या विरोधात अपील करण्यास नकार

सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “तिथे ज्याप्रकारे अंपायरिंग होत होते, त्याबद्दल आम्हाला खूप आश्चर्य वाटले. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही बांगलादेशात येऊ तेव्हा आम्ही आमच्या मनाची खात्री करून घेऊ की आम्हाला अशा प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जावे लागेल आणि त्यानुसार स्वतःला तयार करावे लागेल.” मालिकेच्या शेवटी जेव्हा दोन्ही संघ ट्रॉफीसोबत छायाचित्रांसाठी पोझ देत होते, तेव्हा हरमनप्रीत म्हणाली “अंपायर्सनाही घेऊन या.” तो सर्व प्रकार बांगलादेशची अंपायरला आवडला नाही आणि तिने थेट ड्रेसिंग रूम गाठले.

बांगलादेशच्या कर्णधाराने हरमनप्रीतवर निशाणा साधला

हरमनप्रीतने अंपायर्सना बोलावण्यास सांगितल्यानंतर बांगलादेशची कर्णधार निगर सुलताना आपल्या संघाला तिथून घेऊन गेली. यासर्व प्रकरणाची आयसीसीने दखल घेतली असून तिला मॅच फी च्या ७५ टक्के दंड आकारला आणि दोन आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी देखील घातली. यावर निगर सुलताना म्हणाली की, “हरमनप्रीतच्या त्या कृतीवर आयसीसीने घेतलेली अ‍ॅक्शन स्वागतार्ह आहे. मात्र, झालेली शिक्षा ही कमी की जास्त यावर फारशी बोलणार नाही. तिने त्यावेळी थोडा आदर दाखवणे आवश्यक होते. झालेली घटना निंदनीय स्वरुपाची आहे.”

हेही वाचा: आशियाई स्पर्धेत हरमनप्रीतला केवळ एक सामना खेळण्याची संधी?भारतीय क्रिकेट संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मागेही एकदा तिने सामन्यानंतर हरमनप्रीतवर टीका केली होती. निगर म्हणाली, “ही पूर्णपणे तिची समस्या आहे. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक खेळाडू म्हणून ती अधिक चांगली वागणूक दाखवू शकली असती. काय झाले ते मी सांगू शकत नाही, पण संघासोबत मला त्या ठिकाणी असणे योग्य वाटले नाही. ते वातावरण चुकीचे होते म्हणून आम्ही परत आलो. क्रिकेट हा शिस्तीचा खेळ असून सर्वांनी त्याचा आदरा केला पाहिजे.