Kamran Akmal criticizes Pakistan team after defeat against Bangladesh Test : पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना मायदेशात गमावल्याने पाकिस्तानचे माजी खेळाडू संतापले आहेत. पहिला डाव घोषित करूनही पाकिस्तान संघाला १० विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. अशा प्रकारे बांगलादेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्याचा आढावा घेताना पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने या पराभवासाठी खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाच्या आधीच्या चुकांना जबाबदार धरले असून जागतिक स्तरावर ही लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे.

जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय बनला –

कामरान अकमल त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मोहम्मद रिझवानने दुसऱ्या डावात ५० धावा केल्या आणि धावफलक चालता ठेवला, अन्यथा पाकिस्तानला डावाने पराभव पत्करावा लागला असता. हा इतका लाजिरवाणा पराभव आहे की तो विसरता येणार नाही. जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट विचार करत असाल, तर तुमच्यासोबत पण वाईटच होणार. पाकिस्तान संघ गेल्या पाच वर्षात काहीच शिकला नाही. त्यांना झिम्बाब्वेकडूनही पराभव पत्करावा लागला. तसेच मागील वर्षी आशिया कपमधून बाहेर पडला होता. यानंतर विश्वचषकातही फजिती झाली. ज्यामुळे आता जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय बनला आहे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

क्लब क्रिकेटर्सही असे खेळत नाहीत –

माजी यष्टीरक्षकाने बांगलादेशच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि म्हटले, “बांगलादेशसाठी ही कठीण वेळ होती, पण त्यांच्या फलंदाजांनी धावा केल्या. त्यांना कसोटी वाचवायची होती आणि त्यांनी एवढेच केले नाही तर सामनाही जिंकला. मुळात त्यांनी पाकिस्तान क्रिकेटचा पर्दाफाश केला.आमचे खेळाडू क्लब क्रिकेटर्सप्रमाणे फलंदाजी करत होते. माफ करा, क्लब क्रिकेटर्सही पण चागले खेळतात. पाकिस्तानी खेळाडूंचा दृष्टीकोन खूप वाईट होता. कारण ड्रेसिंग रुममध्ये खेळाडू एकमेकांवर हसत होते. त्यांना गांभीर्य नव्हते, कारण माहित होते की कोणीही काहीही विचारणार नाही. त्यामुळे असे वाटत होते की ते मनोरंजनासाठी खेळत आहेत.”

हेही वाचा – PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने ६ बाद ४४८ धावांवर डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने १४१ आणि मोहम्मद रिझवानने १७१ धावा केल्या. यानंतर बांगलादेश संघ प्रत्युत्तरात ५६५ धावांवर गारद झाला. यासह बांगलादेशने पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला १४६ धावांवर गुंडाळले. ज्यामुळे बांगलादेशला केवळ विजयासाठी ३० धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने ६.३ षटकात एकही विकेट न गमावता केला.

Story img Loader