Vinesh Phogat Injury: आशियाई क्रीडा स्पर्धेसंदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगाट १३ ऑगस्ट रोजी जखमी झाली होती. या दुखापतीमुळे विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही. विनेशने ऐनवेळी आशियाई स्पर्धेतून माघार घेणे हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय महिला कुस्तीपटू फोगाटने सांगितले की, “रविवारी तिला दुखापत झाल्याने ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.”

विनेश फोगाटने ट्वीट करून ‘या’ शस्त्रक्रियेची माहिती दिली

मंगळवारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये तिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे लिहिले आहे. यासोबतच १७ ऑगस्टला गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, माझ्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. ही शस्त्रक्रिया १७ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. मात्र, आशियाई स्पर्धेतून विनेश फोगाट बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चाहत्यांना विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती, मात्र आता ती या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

हेही वाचा: Irfan Pathan: ‘बेगानी शादी में…’, इरफान पठाणने ट्वीट करून पाकिस्तानी चाहत्यांना दिले चोख प्रत्युत्तर, आशिया कपआधी माइंड गेम सुरु

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, पण…

विनेश फोगाटने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “१७ ऑगस्ट रोजी माझी मुंबईत शस्त्रक्रिया होईल, भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, याआधी मी २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मी जिंकले होते.”

हेही वाचा: R. Ashwin: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाच्या फलंदाजीबाबत अश्विनने मारला टोमणा; म्हणाला, “आठव्या क्रमांकावर…”

विनेश पुढे लिहिते की, “यावेळी दुखापतीमुळे माझ्या आशा आकांक्षांना मोठा धक्का बसला आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी माझे म्हणणे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. मी सर्व चाहत्यांना विनंती करू इच्छिते की त्यांनी मला पाठिंबा द्यावा जेणेकरून मी लवकरच मॅटवर जोरदार पुनरागमन करू शकेन आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी तयारी करू शकेन. तुमचा पाठिंबा मला खूप बळ देतो.” विनेश फोगाट दुखापतीतून लवकर बरी होऊन पुन्हा मॅटवर नव्या दमाने उतरावी म्हणून चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

विनेश जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊ शकणार नाही, यासाठी सराव सामने २५-२६ ऑगस्ट रोजी पटियाला येथे होणार आहेत. विनेश आणि बजरंग पुनिया यांना आशियाई खेळांच्या चाचण्यांमधून सूट देण्यात आली होती,  पॅनेलने घेतलेल्या या निर्णयावर बहुतेक कुस्ती समुदायांनी टीका केली होती. यानंतर आयओए समितीने जागतिक चाचण्यांसाठी कोणत्याही कुस्तीपटूला सूट न देण्याचा निर्णय घेतला. विनेश आणि बजरंग यांनी मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग निश्चित केला नव्हता. १६ सप्टेंबरपासून सुरू होणारी जागतिक स्पर्धा ही २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिली पात्रता स्पर्धा असेल.