Vinesh Phogat Injury: आशियाई क्रीडा स्पर्धेसंदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगाट १३ ऑगस्ट रोजी जखमी झाली होती. या दुखापतीमुळे विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही. विनेशने ऐनवेळी आशियाई स्पर्धेतून माघार घेणे हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय महिला कुस्तीपटू फोगाटने सांगितले की, “रविवारी तिला दुखापत झाल्याने ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विनेश फोगाटने ट्वीट करून ‘या’ शस्त्रक्रियेची माहिती दिली
मंगळवारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये तिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे लिहिले आहे. यासोबतच १७ ऑगस्टला गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, माझ्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. ही शस्त्रक्रिया १७ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. मात्र, आशियाई स्पर्धेतून विनेश फोगाट बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चाहत्यांना विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती, मात्र आता ती या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
‘आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, पण…‘
विनेश फोगाटने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “१७ ऑगस्ट रोजी माझी मुंबईत शस्त्रक्रिया होईल, भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, याआधी मी २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मी जिंकले होते.”
विनेश पुढे लिहिते की, “यावेळी दुखापतीमुळे माझ्या आशा आकांक्षांना मोठा धक्का बसला आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी माझे म्हणणे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. मी सर्व चाहत्यांना विनंती करू इच्छिते की त्यांनी मला पाठिंबा द्यावा जेणेकरून मी लवकरच मॅटवर जोरदार पुनरागमन करू शकेन आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी तयारी करू शकेन. तुमचा पाठिंबा मला खूप बळ देतो.” विनेश फोगाट दुखापतीतून लवकर बरी होऊन पुन्हा मॅटवर नव्या दमाने उतरावी म्हणून चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
विनेश जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊ शकणार नाही, यासाठी सराव सामने २५-२६ ऑगस्ट रोजी पटियाला येथे होणार आहेत. विनेश आणि बजरंग पुनिया यांना आशियाई खेळांच्या चाचण्यांमधून सूट देण्यात आली होती, पॅनेलने घेतलेल्या या निर्णयावर बहुतेक कुस्ती समुदायांनी टीका केली होती. यानंतर आयओए समितीने जागतिक चाचण्यांसाठी कोणत्याही कुस्तीपटूला सूट न देण्याचा निर्णय घेतला. विनेश आणि बजरंग यांनी मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग निश्चित केला नव्हता. १६ सप्टेंबरपासून सुरू होणारी जागतिक स्पर्धा ही २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिली पात्रता स्पर्धा असेल.