जागतिक क्रिकेटमधील निर्विवाद चॅम्पियन अर्थात सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या घोषणेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांपासून ते सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वांनी गुरुवारी हळहळ व्यक्त केली. सचिनच्या निवृत्तीची घोषणा सोशल नेटवर्किंग साईट्सवर वाऱयाच्या वेगाने पसरली आणि एकामागून एक ट्विट आणि पोस्ट सचिनच्या नावानेच लिहिल्या जाऊ लागल्या. जगातील वेगवेगळ्या देशातील क्रीडापटूंपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच सचिनने भारतीय तसेच जागतिक क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
सचिनने निवृत्ती घेण्याचे ठरवल्याचे ऐकून खूप वाईट वाटले. सचिन तेंडुलकर या एका माणसाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली – इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन
सचिन माझा हिरो आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे म्हणजे आनंदाचे क्षण होते – इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन
सचिन तेंडुलकर. क्रिकेटविश्वातील निर्विवाद चॅम्पियन! – इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसन
क्रिकेटमधील सर्वांत गुणवान फलंदाज – क्रिकेट ऑस्ट्रेलिया
कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते महान क्रिकेटपटू होण्यापर्यंत सचिनचा प्रवास जवळून बघायला मिळाला हे माझे भाग्यच आहे. सचिनच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा – माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर
निवृत्तीच्या बातमीनंतर समिश्र स्वरुपाच्या भावना दाटून आल्या आहेत. खरंच अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व! – ललित मोदी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा