Ivory Coast created the world record lowest score in T20I : टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक मोठे आणि रोमांचक सामने पाहिले असतील, डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करताना, तुम्ही पत्त्याच्या घराप्रमाणे संघ कोसळताना पाहिले असतील. पण २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एखादा संघ अवघ्या ७ धावांत गारद झालेला तुम्ही कधी पाहिला आहे का? कदाचित नाही, परंतु अशी घटना आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता सी २०२४ दरम्यान घडली आहे. ही घटना नायजेरिया विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्यात पाहिला मिळाली. या सामन्यात नायजेरियाने हा सामना २६४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नायजेरियाने आयव्हरी कोस्टविरुद्ध २० षटकांत ४ गडी गमावून २७१ धावा केल्या. नायजेरियासाठी फलंदाजी करताना त्यांचा सलामीचा फलंदाज सेलिम सलाऊ चमकला, त्याने शानदार शतकी (११२) खेळी साकारली. आयव्हरी कोस्ट संघ सेलीम सलाऊला बाद करू शकला नाही, परंतु इतर फलंदाजांना संधी देण्यासाठी तो रिटायर्ड आऊट झाला करण्यात आले.
सेलिम सलाऊने झळकावले शतक –
सेलिम सलाऊने ११२ धावांच्या खेळीत १३ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार ठोकले. या कालावधीत आयव्हरी कोस्टच्या तीन गोलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा दिल्या, तर दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ४५ धावा दिल्या. २७२ धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना आयव्हरी कोस्टचा संघ १० षटकेही क्रीझवर टिकू शकला नाही.
हेही वाचा – Virat Kohli : शतक झळकावून परतणाऱ्या विराटला गौतम गंभीरने मारली मिठी, दोघांचा भावनिक VIDEO व्हायरल
आयव्हरी कोस्ट संघाने नोंदवली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात नीचांकी धावसंख्या –
आयव्हरी कोस्टचा संपूर्ण संघ ७.३ षटकांत केवळ ७ धावांवर गडगडला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात कमी सांघिक धावसंख्या आहे. याआ धी दोन संघ १० धावांत ऑलआऊट झाले होते, मात्र एकेरी धावसंख्येवर संघ ऑल आऊट होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.