जपान हा आशियाई खंडातील दमदार संघ तर आयव्हरी कोस्ट आफ्रिका खंडातला कट्टर प्रतिस्पर्धी. मध्यरक्षणातल्या चतुर खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या जपानचा सलामीच्या लढतीत मुकाबला आहे ताकदीचा खेळ करणाऱ्या आयव्हरी कोस्टशी. दोन भिन्न शैलींमधला हा मुकाबला चाहत्यांसाठी दर्जेदार खेळाची पर्वणी ठरणार हे नक्की. याया टौरे आणि सर्जे ऑरियर आयव्हरी कोस्टच्या डावपेचांचा आधारस्तंभ असणार आहेत. शेवटच्या दोन विश्वचषकांमध्ये प्राथमिक फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने आयव्हरी कोस्ट यंदा चांगली सुरुवात करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दिदिएर ड्रोग्बा जपानसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व करणारा शिंजी कागावा आणि एसी मिलानतर्फे खेळणारा केईसुके
होंडा जपानच्या डावपेचांचा कणा आहेत. मात्र
आयव्हरी कोस्टसारख्या आक्रमणावर भर देणाऱ्या संघासमोर बचावाच्या मुद्दय़ावर जपानचा बचाव तोकडा पडू शकतो.
‘क’ गट : जपान वि. आयव्हरी कोस्ट
स्थळ :  एरिना परनामब्युको

Story img Loader