नानजिंग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या चार वेटलिफ्टर्सना वयचोरीच्या कारणावरून स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र भारतीय खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात आली, पण त्यांची कामगिरी पदकासाठी ग्राह्य़ धरण्यात आली नाही, असा दावा भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) केला आहे.
चंद्रिका तारफदार (४८ किलो), ज्योती माल (५३ किलो), मनप्रीत कौर (६३ किलो) या महिला खेळाडूंपाठोपाठ अक्षय भगवान (६२ किलो) याला स्पर्धेतील सहभागाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले
आहे. त्यांनी केलेली कामगिरी पदकासाठी ग्राह्य़ धरण्यात आली नाही. भारतीय वेटलिफ्टर्सनी उचललेले वजन त्यांच्या नावासमोर लिहिण्याऐवजी त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, असे लिहिण्यात आले, असे आयडब्ल्यूएफच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय खेळाडू फक्त पदकासाठी अपात्र ; वेटलिफ्टिंग महासंघाचा दावा
नानजिंग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या चार वेटलिफ्टर्सना वयचोरीच्या कारणावरून स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते.
First published on: 23-08-2013 at 05:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iwf officials claim lifters disqualified for medals only