इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेले चार हंगाम कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदा जॅक कॅलिस मार्गदर्शक आणि फलंदाजीचा सल्लागार या भूमिकेत दिसणार आहे. २०११पासून कॅलिस कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. २०१२ आणि २०१४मध्ये कोलकातान संघाने आयपीएल जेतेपदावर नाव कोरले होते. या यशात कॅलिसची महत्त्वाची भूमिका होती. याचप्रमाणे गतवर्षी कोलकाताने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. ‘‘कोलकाता हे गेली चार वष्रे माझे भारतीय कुटुंबीय आहे. माझे सर्वाशी चांगले संबंध आहेत. कोलकाताच्या दोन आयपीएल जेतेपदातही माझी कामगिरी महत्त्वाची होती,’’ असे कॅलिसने सांगितले.

Story img Loader