पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संभाव्य संघाची घोषणा करण्यात आली; मात्र या संघातून अनुभवी खेळाडू जॅक कॅलिसला डच्चू देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून जॅक कॅलिसने आपली निवृत्ती जाहीर केली.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जॅक कॅलिसने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र ट्वेन्टी-२० प्रकारासाठी निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या योजनेत कॅलिस बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१५मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचे उद्दिष्ट असल्याचे कॅलिसने स्पष्ट केले होते.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कॅलिसचा संघात समावेश नसणे, ही आश्चर्यकारक गोष्ट नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ट्वेन्टी-२० संघाचा कॅलिस गेले काही महिने तरी भाग नाही. ५० षटकांच्या सामन्यांसाठी संघाचा भाग होण्याची मनीषा त्याने व्यक्त केली आहे,’’ असे क्रिकेट  दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.
संभाव्य संघ : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), कायले अबॉट, हशीम अमला, फरहान बेहराडिन, हेन्री डेव्हिड्स, क्विंटन डी कॉक, एबी डी व्हिलियर्स, जेपी डय़ुमिनी, डीन एल्गर, बेऊरन हेंड्रिक्स, इम्रान ताहीर, कॉलिन इन्ग्राम, रॉकी क्लेनव्हेलडट, रायन मॅकलरेन, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरिस, जस्टिन ऑनटाँग, वेन पार्नेल, रॉबिन पीटरसन, आरोन फानसिंगो, व्हरनॉन फिलँडर, रिले रोसू, डेल स्टेन, रस्टी थेरॉन, लोनव्ॉबो त्सोसोबे, वॉन व्हॅन जार्सव्हेल्ड, डॅन व्हिलास, हर्डस व्हिलऑन, डेव्हिड वाइज.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा