Jacques Kallis Top 5 Players Before World Cup 2023: आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा थरार लवकरच सुरु होणार जाईल. या महत्त्वाच्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून चाहत्यांना आपापल्या देशांच्या स्टार खेळाडूंची कामगिरी पाहण्याची प्रतीक्षा आहे. या स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी अव्वल ५ खेळाडूंची निवड केली आहे. ज्यामध्ये त्याने फक्त एका भारतीय खेळाडूची निवड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरं तर, आयसीसीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कॅलिसने विराट कोहली, बाबर आझम, एनरिक नॉर्खिया, जोस बटलर आणि राशिद खान यांची निवड केली आहे. हे पाच खेळाडू एकदिवसीय विश्वचषकात चांगली कामगिरी करतील, असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे.

राशिद खान अफगाणिस्तानसाठी मोठा खेळाडू सिद्ध होऊ शकतो –

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जॅक कॅलिस म्हणाला की, “माझ्यासाठी राशिद खान असा खेळाडू आहे, जो अफगाणिस्तानसाठी मोठा खेळाडू असल्याचे सिद्ध होऊ शकतो. अलीकडे त्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि ती परिस्थिती त्याला अनुकूल असेल. मला वाटते की तो पुढे येऊन नेतृत्व करेल, तो एक योद्धा आहे आणि तो अफगाणिस्तानसाठी मोठी भूमिका बजावणार आहे.”

हेही वाचा – Neck Guards: विश्वचषकापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ नव्या नियमामुळे कांगारू फलंदाजांची वाढली चिंता, जाणून घ्या काय आहे?

जॅक कॅलिस पुढे म्हणाला की, याशिवाय, त्याने स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीचेही कौतुक केले आणि सांगितले की, “हा त्याचा मायदेशातील शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तो उत्सुक असणार आहे. विराट कोहली हा माझा दुसरा पर्याय असेल, तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याला जगात धुमाकूळ घालायला आवडेल.”

हेही वाचा – IND vs PAK: भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदी जावई शाहीन शाहवर संतापला; म्हणाला, ‘जर नसीमप्रमाणे…’

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज पुढे म्हणाला की, “हा कदाचित त्याचा शेवटचा विश्वचषक आहे, जो तो त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि तो तेथे धमाकेदारपणे पूर्ण करू इच्छितो. कारण मला वाटते की तो भारतासाठी टॉप ऑर्डरमध्ये मोठी भूमिका बजावणार आहे. नॉर्खिया या स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज बनू शकतो आणि बटलर इंग्लंडला वेगवान सुरुवात करून देण्यासाठी उत्सुक असेल.”