Colombo ground staff gets Rs 43 lakh from Jay Shah: आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीत टीम इंडियाने श्रीलंकेचा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांत आटोपला. यानंतर भारतीय संघाने अवघ्या ६.१ षटकांत लक्ष्याचा सहज पाठलाग केला. मात्र या पराभवाने श्रीलंका संघ निराशा होण्यापूर्वी एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला ५०,००० अमेरिकन डॉलर (४२ लाख रुपये) जाहीर केले आहेत. याबरोबरच जय शाह यांनी प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफच्या कामाचेही कौतुक केले आहे. त्याच्या मेहनतीमुळेच आशिया चषकचा फायनल सामना विना अडथळा पार पडला.

फायनल सामना ४० मिनिटे उशिरा झाला होता सुरू –

जय शाह यांनी ग्राउंड स्टाफला त्यांच्या कामासाठी ही बक्षीस रक्कम दिली आहे. खरं तर, संपूर्ण आशिया कपमध्ये कोलंबोमध्ये पाऊस होता आणि ग्राउंड स्टाफने मैदान तयार करण्यात प्रशंसनीय काम केले. अंतिम सामन्यातही नाणेफेकीनंतर पाऊस पडला, मात्र मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मैदान लवकर तयार करण्यात आले. मात्र, तरीही सामना ४० मिनिटे उशिराने सुरू झाला.

हेही वाचा – Asia Cup Final 2023 IND vs SL: यष्टीरक्षक केएल राहुलने पहिल्या स्लिपमध्ये जात घेतला जबरदस्त झेल, पाहा VIDEO

शाह यांनी प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफचे कौतुक केले –

जय शाह यांनी प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफच्या कामाचेही कौतुक केले आहे. त्यानी एक्स अॅपवर एक पोस्ट करताना म्हटले की, “क्रिकेटच्या गमनाम नायकांना खूप खूप सलाम! “आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आणि श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) यांना कोलंबो आणि कँडीमधील समर्पित क्युरेटर्स आणि ग्राउंड्समॅनसाठी US$50,000 चा योग्य पुरस्कार निधी जाहीर करताना अभिमान वाटत आहे.”

जय शाह पुढे म्हणाले, “त्यांची अटूट बांधिलकी आणि मेहनत यामुळे आशिया कप २०२३ हा एक अविस्मरणीय देखावा बनला. खेळपट्टीच्या उत्कृष्टतेपासून ते हिरव्यागार मैदानापर्यंत, त्यांनी रोमांचक क्रिकेट दाखवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले.”

सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्यात श्रीलंकेने प्रथम प्रथम फलंदाजी करताना अंतिम सामन्यात टीम इंडियाला केवळ ५१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. भारतीय संघाने हे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता अवघ्या ३७ चेंडूत पूर्ण केले. शुबमन गिल १९ चेंडूत २७ धावा करून नाबाद परतला आणि इशान किशन १८ चेंडूत २३ धावा करून नाबाद परतला. गिलने ६ चौकार मारले तर ईशानने ३ चौकार मारले.

हेही वाचा – Asia Cup Final 2023 IND vs SL: मोहम्मद सिराजच्या सहाही विकेट्सचा VIDEO बघा एका क्लिकवर

तत्पूर्वी टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना शानदा गोलदांजी केली. या सामन्यात भारताकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने एकाच षटकात ४ विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने सात षटकांत २१ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्या ३ आणि जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jai shah announced a reward of 42 lakhs to the ground staff of r premadasa stadium colombo vbm