Jay Shah’s React on Media Rights Agreement and India Vs Afghanistan Series: टीम इंडियाचे यंदाचे वेळापत्रक खूपच व्यस्त असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धही खेळणार आहे. तसेच २०२३ चा विश्वचषकही भारतात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. एका रिपोर्टनुसार भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारी २०२४ मध्ये मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही अफगाणिस्तान मालिका तसेच मीडिया हक्कांबाबत प्रतिक्रिया दिली.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी मुंबईतील सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर सांगितले की, ऑगस्टच्या अखेरीस क्रिकेट सामन्यांच्या प्रसारमाध्यमांचे अधिकार निश्चित केले जातील. ज्यामध्ये २०२३ विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचाही समावेश असेल. विश्वचषकानंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका पुढे ढकलण्यात आली आहे.

पुरुष आणि महिला संघ हँगझोऊ आशियाई खेळांसाठी पाठवले जाणार –

भारतीय पुरुष आणि महिला संघ हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाईल. ते म्हणाले की, अ संघ आणि ब संघात फरक राहणार नाही. शाह म्हणाले, “आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहोत. सर्वोच्च परिषदेने आमच्या पुरुष आणि महिला संघांच्या सहभागास मान्यता दिली आहे.” भारतीय डोमेस्टिक सर्किट आणि इंडियन प्रीमियर लीगमधून खेळाडूंना निवृत्त होण्यापासून रोखण्यासाठी बोर्ड लवकरच एक धोरण घेऊन येईल, असे बीसीसीआय सचिवांनी सांगितले.

हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: स्टीव्ह स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो पुन्हा आमनेसामने, दोघांच्या वादावादीचा VIDEO होतोय व्हायरल

पूर्वनियोजित सेवानिवृत्तीची प्रवृत्ती थांबवण्यासाठी धोरण तयार करणार –

जय शाह म्हणाले, “आम्ही पूर्वनिर्धारित निवृत्तीची ही प्रथा बंद करण्यासाठी धोरण तयार करू. अधिकारी एक धोरण तयार करतील आणि मंजुरीसाठी पाठवतील.”बीसीसीआय सचिव म्हणाले की क्रीडा व्यवस्थापन फर्म ग्रँट थॉर्नटनने विश्वचषकाचे आयोजन करणार्‍या १२ पैकी १० स्टेडियमचे अपग्रेड आणि दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्या सूचना पाठवल्या आहेत.

हेही वाचा – Sourav Ganguly Birthday: सौरव गांगुलीचा ‘महाराजा’ ते ‘दादा’ पर्यंतचा जीवनप्रवास, जाणून घ्या भावामुळे कसे बदलले नशीब?

आशियाई स्पर्धेपूर्वी महिला संघाकडे कोचिंग स्टाफ असेल –

शाह म्हणाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय वरिष्ठ महिला संघाला मुख्य प्रशिक्षकासह प्रशिक्षक कर्मचारी मिळतील. क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) शिफारस केल्यानुसार अमोल मजुमदार यांचे नाव न घेता, ते म्हणाले की संघाने नाव निश्चित केले आहे. ते म्हणाले, “सीएसीने मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची शिफारस केली आहे. ते फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकाचीही मुलाखत घेतील. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आम्ही सर्व प्रशिक्षकांची नावे जाहीर करू.”

Story img Loader