Asia Cup 2023 Jay Shah Pakistan Invitation: आशिया चषक २०२३चे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी बीसीसीआय सचिव आणि एसीसी अध्यक्ष जय शाह यांना आशिया चषक स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. पीसीबीने सांगितले की, “शाह व्यतिरिक्त त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचा भाग असलेल्या इतर मंडळांच्या प्रमुखांनाही उद्घाटन सामन्यासाठी आमंत्रित केले आहे.” पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, “शाह यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, परंतु त्यांच्या येण्याची फारशी आशा नाही.”
वृत्तानुसार, पीसीबीने आयसीसीच्या बैठकीत पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी जय शाह यांना तोंडी आमंत्रण दिले होते. जेव्हा ते दोघे आयसीसीच्या बैठकीसाठी डर्बनमध्ये भेटले होते. बोर्डाने आता औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. शाह यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते, परंतु बीसीसीआय सचिवांनी हा दावा फेटाळून लावला होता. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, “जय शाह यांनी झका अश्रफचे आमंत्रण स्वीकारले असल्याची बातमी पाकिस्तानी मीडियामध्ये फिरू लागली, परंतु भारतीय बोर्डाच्या अधिकाऱ्याने ते स्पष्टपणे नाकारले.”
भारत-पाकिस्तानमधील सध्याचे संबंध पाहता, पीसीबीला शाहांना निमंत्रित करून खेळाची राजकारणाशी सांगड घालत नाही हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. हे मत भारताबरोबरच्या क्रिकेट संबंधांबाबत पाकिस्तानची भूमिका अधोरेखित करते की ते खेळात राजकारण मिसळत नाही. आशिया कप २०२३ पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या मैदानावर ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
माहितीसाठी की, पाकिस्तानी मीडियाने यापूर्वी शाह यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारल्याचे वृत्त दिले होते, परंतु बीसीसीआय सचिवांनी हा दावा फेटाळून लावला होता. जय शाह यांनी झका अश्रफ यांचे आमंत्रण स्वीकारल्याचे पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, पीसीबीला खडबडून जग आली. भारतीय बोर्डाच्या अधिकाऱ्याने नंतर स्पष्टपणे नकार दिल्यानंतर त्यांची मान शरमेने खाली गेली.
भारतीय संघ २ सप्टेंबरला पाकिस्तानसोबत पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि अफगाणिस्तान या संघांचा या स्पर्धेत समावेश आहे. सर्व ६ संघांची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील २-२ संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करतील. येथे सर्व संघांना तीन सामने खेळायला मिळतील आणि त्यानंतर अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील, जो १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळला जाईल. भारताने ७ वेळा आशिया कप जिंकला आहे, तर श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ट्रॉफी जिंकली आहे.