घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर जयपूर पिंक पँथर्सने बंगळुरू बुल्स संघाला ३६-३१ असे पराभूत करत प्रो-कबड्डी लीगमध्ये अव्वल स्थान पटकावले, त्यांचे आता ४० गुण झाले आहेत.
चुरशीच्या या लढतीत पूर्वार्धात जयपूर संघ १७-२० असा पिछाडीवर होता, मात्र उत्तरार्धात त्यांच्या खेळांडूनी जोरदार चढाया व अचूक पकडी करीत विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयाचे श्रेय राजेश नरवाल (८) व जसवीरसिंग (६) यांना द्यावे लागेल. बंगळुरू संघाच्या राजेश मंडल (६) व मनजित चिल्लर (५) यांची लढत अपुरी ठरली.
उत्कंठापूर्ण लढतीत बंगळुरू संघाने १०व्या मिनिटाला एक लोण नोंदवीत १२-७ अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत त्यांची आघाडी कायम होती. २५व्या मिनिटाला जयपूरने लोण नोंदवीत २४-२२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर बंगळुरूने दोन गुणांची कमाई करीत २४-२४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सांघिक कौशल्याच्या जोरावर जयपूरने ३०व्या मिनिटाला २९-२५ अशी आघाडी घेतली आणि आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. जयपूरने चढायांमध्ये २१ व पकडीत ११ गुणांची कमाई केली. बंगळुरू संघाने चढायांमध्ये १५ व पकडीत १२ गुण मिळविले.
बंगळुरूवरील विजयासह जयपूर अव्वलस्थानी
घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर जयपूर पिंक पँथर्सने बंगळुरू बुल्स संघाला ३६-३१ असे पराभूत करत प्रो-कबड्डी लीगमध्ये अव्वल स्थान पटकावले, त्यांचे आता ४० गुण झाले आहेत.
First published on: 21-08-2014 at 12:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaipur beat bengaluru in pro kabaddi league