मुंबई : जयपूर पिंक पँथर्स संघाने पुणेरी पलटनचा ३३-२९ असा पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात विजेतेपदाचा मान मिळवला. जयपूरचे हे दुसरे विजेतेपद ठरले.

विजयाच्या जवळ येऊनही पुणेरी पलटण संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. त्यांच्या चढाईपटूंना मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना विजेतेपदापासून वंचित राहावे लागले.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

अंतिम सामन्याच्या पूर्वार्धातील खेळ आकर्षक ठरला. जयपूरला पलटणकडून जबरदस्त प्रतिकार झाला. मध्यंतराला खेळ थांबला, तेव्हा जयपूरकडे १४-१२ अशी दोनच गुणांची आघाडी होती. पुढे जाऊन हीच आघाडी निर्णायक ठरली. पलटणने सामन्याची आघाडीने सुरुवात केली. मात्र, पुढे त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. पलटणच्या बचावपटूंना येत असलेले अपयश त्यांच्यासाठी मारक ठरले. उत्तरार्धात सुरुवातीलाच पलटण संघाला लोणला सामोरे जावे लागले. त्यामुळे जयपूरची बाजू भक्कम झाली. अखेरच्या टप्प्यात जयपूरकडे २५-२१ अशी आघाडी होती. या टप्प्यात जयपूरच्या खेळाडूंनी दाखवलेला संयम महत्त्वाचा ठरला. त्याच वेळी पलटणचे चढाईपटू आपला खेळ उंचावू शकले नाहीत.

जयपूरच्या अर्जुन देशवाल आणि अजित कुमारने चढाईची आघाडी समर्थपणे सांभाळली. कर्णधार सुनिल कुमारने बचावात ५ गुणांची कमाई करून महत्त्वाची भूमिका बजावली. पलटणसाठी आदित्य आणि आकाश शिंदे यांना चढाईत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अस्लम इनामदारची उणीव निश्चित भासली. नादाराजन, नबीबबक्ष, फजल अत्राचली या परदेशी खेळाडूंनी बचावाची बाजू सांभाळली होती. मात्र, मध्यंतराला राहिलेली पिछाडी आणि उत्तरार्धात मिळालेला लोण यामुळे पलटणचा पराभव झाला.

Story img Loader